मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आतापर्यंत मराठी आणि हिंदी सिनेमे, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.मात्र आता तो लवकरच साउथच्या सिनेमातून दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीत त्याच्या अभिनयाची छाप पाडणार आहे.अभिनेता श्रेयस हा मराठी सिनेसृष्टीतला लोकप्रिय चेहरा आहे. त्याने ‘इकबाल’, ‘गोलमाल’, ‘कौन प्रवीण तांबे’, ‘ओम शांती ओम’ या सिनेमांद्वारे बॉलिवूडमध्येही लोकप्रियता मिळवली. तर काही काळापूर्वी त्यांने झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून यश ची भूमिका साकारत घराघरात पोहचला. वेगवेगळ्या माध्यमांतून अभिनयाची छाप पाडणाऱ्या श्रेयस तळपदेन आता साउथमध्ये पदार्पण करणार आहे.(Shreyas Talpade South Movie)
सुमीत राघवन, शरद केळकर, रितेश देशमुख यांसारख्या काही मोजक्या कलाकारांना वगळल्यास बरेचसे कलाकार हे अनेकदा बॉलिवूड किंवा दाक्षिणात्य चित्रसृष्टीत छोट्या किंवा कमी वेळ दिसणाऱ्या भूमिका साकारताना दिसत असतात. मात्र श्रेयस तळपदे त्याच्या साउथमधील पदार्पणात मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस ‘अजग्रथा’ या एम शशिधर दिग्दर्शीत कन्नड सिनेमात पाहायला मिळणार आहे.
पाहा कोणत्या चित्रपटातून झळकणार आहे श्रेयस (Shreyas Talpade South Movie)
हा सिनेमा सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर बेस असणार आहे. श्रेयसने नुकतच त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून चित्रपटाच्या टीम सोबत फोटोज पोस्ट माहिती दिली आहे. या चित्रपटाची माहिती देताना त्यांने पोस्ट खाली लिहीलं आहे की ” तुम्ही मला दाक्षिणात्य सिनेमाच्या हिंदी डबिंगसाठी एवढे प्रेम दिले, आता तुम्ही मला दमदार साऊथ मुव्ही हिरोच्या भूमिकेत पाहू शकाल. नवीन सुरुवात, नेहमी आभारी राहीन.त्याने केलेल्या या पोस्टनंतर अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.(Shreyas Talpade South Movie)
‘अजग्रथा’ व्यतिरिक्त श्रेयसचे इतरही काही प्रोजेक्टस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान गेल्या काही दिवसात श्रेयसने घोषणा केलेला हा पहिलाच प्रोजेक्ट नाही. याआधी काहीच दिवसांपूर्वी त्याच्या ‘द गेम ऑफ गिरगिट’ या सिनेमाची घोषणा झाली. या सिनेमात तो द केरला स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मासोबत मुख्या भूमिकेत दिसणार आहे.
हा सिनेमा ब्लू व्हेल या भयंकर गेमवर आधारित असावा असे बोलले जात आहे. तर त्याआधी काही दिवसांपूर्वी श्रेयसने ‘पोस्टर बॉइज २’ या मराठी सिनेमाची घोषणा केली. २०१४ साली हिट ठरलेल्या सिनेमाचा हा सिक्वेल असून अजय मयेकर याचे दिग्दर्शन करत आहेत. ‘पोस्टर बॉइज २’मध्ये अनिकेत विश्वासराव, दिलीप प्रभावळकर आणि हृषिकेश जोशी मुख्य भूमिकेत आहेत.
