Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व सुरु झाल्यापासून या पर्वाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. हा वादग्रस्त शो छोटा पडदा गाजवताना दिसत आहे. या शोमध्ये नेहमीच स्पर्धकांमध्ये वादावादी झालेली पाहायला मिळते. यंदाच्या या नव्या पर्वात अभिनेते, अभिनेत्री, गायक, रॅपर, रील स्टार यांनादेखील सहभाग होण्याची मोठी संधी मिळाली. ही स्पर्धक मंडळी ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडे करताना दिसत आहेत. हे राडे आटोक्यात आणण्यासाठी ‘बिग बॉस’ व या शोचा होस्ट रितेश देशमुख स्पर्धकांवर नजर ठेवून आहेत. यंदाच्या या नव्या पर्वाच्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुखने स्वीकारली आहे.
यापूर्वीच्या ‘बिग बॉस मराठी’च्या सीझनमधील प्रत्येक विकेंडला महेश मांजरेकर त्यांच्या चावडीवर स्पर्धकांची शाळा घ्यायचे. याची जागा आता भाऊच्या धक्क्याने घेतली आहे. शो सुरु झाल्यापासूनच सोशल मीडियावर रितेशची मांजरेकरांबरोबर तुलना होत आहे. अनेकदा या ठिकाणी महेश मांजरेकरच हवे होते, अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अशातच नव्या पर्वाच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश स्पर्धकांची शाळा घेताना दिसला आहे.
गेले तीन आठवडे भाऊच्या धक्क्याने अक्षरशः गाजवले. रितेशने भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली. आणि स्पर्धकांपर्यंत महाराष्ट्राचा पाठिंबा पोहोचवला. यानंतर आता चौथ्या आठवड्यात भाऊचा धक्का काय गाजणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या. याचा एक प्रोमो कलर्स मराठी या ऑफिशिअल वाहिनीवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख स्पर्धकांची शाळा घेणार असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर झाला बाबा, घरी चिमुकल्याचे आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
“‘बिग बॉस’मध्ये जान्हवीने सगळ्यात महत्त्वाचा नियम ब्रेक केला यावर काय ॲक्शन घेणार हे बघायचं आहे. जान्हवीने आर्याला धक्का दिला”, “रितेश सर आज जान्हवीचा जाळ काडा. ती पॅडी दादाच्या करिअरवर बोलत आहे”, “रितेश भाऊ आज जान्हवी व निक्कीला त्यांची काय लायकी आहे हे दाखवून द्या. सारखी दुसऱ्यांची लायकी काढत असतात”, “हा आठवडा आर्याने गाजवला तो ही योग्य पद्धतीने रितेश सर तिचं कौतुक करा आणि ती बरोबर होती हे बी टीमला ही कळु दया. खासकरुन अभिजीतला”, “जान्हवीला आज घराबाहेर काढा”, “भाऊच्या धक्क्यावर जरा टीम एची वाट लावा. सगळे माजलेत”, अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी करत रितेशला जाब विचारायला सांगितलं आहे.