रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “रंग माझा वेगळाचा एपिसोड दुसऱ्याच शोमध्ये झाला”, मराठी अभिनेत्रीचा जान्हवीला सणसणीत टोला, पॅडीची माफी मागितली म्हणून…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 22, 2024 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5

'बिग बॉस मराठी' मधील जान्हवी किल्लेकरच्या वागणुकीवर अनघा अतुलचा टोला, पोस्ट शेअर करत केलं भाष्य

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या सुरु असलेले वाद, अपमान अनेकांना खटकू लागले आहेत. यंदाच्या पर्वातील अभिनेत्री जान्हवी किल्लेकर विशेष चर्चेत आली आहे. जान्हवीची वागणूक अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना खटकू लागली आहे. निक्की तांबोळी बरोबर राहून जान्हवीने स्वतःला तिच्या छत्रछायेखाली घेतलं. जान्हवीच हे वागणं अनेकांना खटकलं. यापूर्वी तिच्या प्रत्येक चुकीनंतर रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची शाळा घेतली. जान्हवीला तिची चूक दाखवत तिची चांगलीच कानउघडणी केली.

यानंतर आता जान्हवीची आणखी चूक साऱ्यांनी पकडली असून विविध क्षेत्रातून तिला ट्रोल करण्यात आले आहे. जान्हवी टास्क दरम्यान अभिनेते पॅडी कांबळे यांचा अपमान केला. पॅडी यांना ती तिच्या कारकिर्दीवरुन बोलली असल्याचं समोर आला. सिनेसृष्टीतील कारकिर्दीवरुन जान्हवीने पॅडी यांचा अपमान केलेला अनेकांना खटकला. अनेक कलाकार मंडळींनी यावरुन पोस्ट शेअर करत टोला लगावला.

आणखी वाचा – “खोटे अश्रू, जीभेला आवर घाल आणि…”, पॅडीची माफी मागणं जान्हवीचं नाटक म्हणत विशाखा सुभेदारची पोस्ट, म्हणाल्या, “नौटंकी…”

या प्रकारानंतर जान्हवीने पॅडी कांबळे यांची माफीही मागितली. माफी मागताना केलेली ओव्हर ऍक्टिंगही अनेकांना खटकली. यावरुन जान्हवी पुन्हा एकदा ट्रोल झाली. आता जान्हवीच्या या वागणुकीवर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. अभिनेत्री अनघा अतुलने एक पोस्ट शेअर करत जान्हवीला चांगलाच टोला लगावला आहे. “आज रंग माझा वेगळाचा एपिसोड वेगळ्याच शोमध्ये पाहिला. सीन असा होता की, विलन पकडली गेल्याने माफी मागत आहे. कडक सीन, कडक अभिनेत्री”, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टन झाल्यानंतर निक्कीचं वागणच बदललं, टीमलाही खटकली गोष्ट, जान्हवीसह अरबाजही म्हणाला, “असंच आयुष्य बाहेरही…”

अनघा अतुल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अनघाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्टोरी शेअर करत तिने ‘बिग बॉस’मधील जान्हवी किल्लेकरच्या वागणुकीवर भाष्य केलं आहे. सध्या जान्हवी तिने केलेल्या अपमानावरुन चर्चेत आली असून अनेकजण तिला टोला लागवताना दिसत आहेत.

Tags: anagha atul on jahnavi killekarbigg boss marathibigg boss marathi 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
ayesha takia new look viral

मोठे ओठ, विचित्र चेहरा अन्…; चांगलं दिसण्याचा नादात आयशा टाकियाचा लूकच बदलला, नेटकरी म्हणाले, “अशी का झालीस?”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.