Kolkata Rape Case News : सध्या देशातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे कोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरण. ९ ऑगस्टला कोलकाता येथील आर. जी. आर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तरुणीला न्याय मिळण्याकरिता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. बॉलीवूड कलाकारांसह मराठी कलाकारदेखील याप्रकरणावर आपल्या तीव्र भावना व्यक्त करत आहेत. अशातच आता अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरने एका कवितेच्या माध्यमातून या प्रकरणावर तिचं परखड मत मांडलं आहे. (Kshitija Ghosalkar Poem on Kolkata Rape)
क्षितिजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमधून तिने या संपूर्ण प्रकरणावर तिचं मत व्यक्त केलं आहे. या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “आईनेही रक्त सांडलं माझ्या जन्माच्या वेळी, मी ही पाहिलं वयात आल्यावर जेव्हा आली मासिक पाळी, First Sex तेव्हाही रक्तचं आणि रेप तेव्हा तर रक्तचं रक्त, ब्लेडने पाठीवर वार केलेले ओरखडे किती? डोळ्यांसमोर भीषण चेहरे आणि एक अनामिक भीती, प्रत्येक वेळेला का द्यावी लागते मला आहुती रक्ताची? आणि भयला साथ आहे डोळ्यातील अश्रूंची. रेपसाठी नव्हती कारणीभूत माझ्या कपड्यांची Size, जरा वाढवा तुमच्या विचाऱ्यांच्या कक्षा If You Are Wise”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधील ‘या’ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार, कुणाला मिळणार घरचा आहेर?
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी साडी नेसून फिरले तरी तोडले जातात ना लचके माझ्या शरीराचे, मग उद्या बिकनी घालून फिरले तर शिकवून नका धडे संस्कृती आणि संवर्धनाचे, माझ्यावर वेळेची बंधन घालण्यापेक्षा तुम्ही मर्यादाची बंधनं पाळणं जास्त गरजेचं आहे, कारण माझ्या क्लीवेजपेक्षा जास्त खोल तुमच्या विकृतीची नजर आहे, तिच्या मनावर उमटलेल्या ओरखडयाची वाघनखं उडाली, तिच्या डोळ्यातून पाण्याऐवजी रक्त येण्याआधी ‘ती’साठी लढूया, स्त्री हे देवीचं रुप, तेही शक्तीचं, अत्याचाराच्या रक्ताचा टीळा माथ्यावर लावून ‘ती’ला न्याय मिळवून देऊ या”.
दरम्यान, क्षितिजाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओखाली तिच्या कवितेचे कौतुक करत अगदी योग्य शब्दांत स्त्रियांची व्यथा मांडली असल्याचे व अनेकांनी या नारधमांना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसंच या प्रकरणावर मराठी कलाविश्वातून अनेक कलाकारांनी आपला राग, चीड व उद्रेक व्यक्त केला आहे. सिद्धार्थ चांदेकर, हेमांगी कवी, सई ताम्हणकर, समीर विद्वांस, जिनिलीया देशमुख यांसारख्या अनेकांनी याबद्दल आपला म्हणणं व्यक्त केलं आहे.