रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “कुत्रीच आहे, हिची औकात…”, आर्याला घाणेरड्या शब्दांत निक्कीने सुनावलं, मर्यादा ओलांडत तिच्या अंगावर पडली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 16, 2024 | 4:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update yesterday's episode, Nikki refers to Aarya as a dog

Bigg Boss Marathi 5च्या कालच्या भागात निक्कीची जीभ पुन्हा घसरली, कुत्री म्हणत केला अपमान

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या चांगलेच गाजताना दिसत आहे. शोमध्ये येणारे ट्विस्ट व खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. शोमधून एकामागून एक रंजक वळण येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची या शोविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. या घरात अनेकदा भांडणं, वाद व मारामारी पाहायला मिळते. अशातच कालच्या भागातही टास्कदरम्यान निक्की व अरबाज यांच्यात बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीमध्ये निक्कीने आर्याचा उल्लेख कुत्री म्हणून केला. टास्कमध्ये झालेल्या झटापटीत निक्कीने आर्याबद्दल हा शब्द वापरला आहे. (Bigg Boss Marathi 5 Update)

कॅप्टन पद मिळवण्यासाठी घरातील सदस्यांना बोटीत बसून मोती शोधायचे होते आणि यातून कॅप्टन पदाचे उमेदवार बाजूला करायचे होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्य बोटीतून मोती शोधण्याचा प्रयत्न करत होते. जेणेकरून त्यांना कॅप्टन पदासाठीचा योग्य उमेदवार मिळेल. त्यामुळे या टास्कमध्ये निक्की व अरबाज यांच्यात मोती मिळवण्यासाठी चढाओढ झाल्याची पाहायला मिळाली. यावेळी टास्कमध्ये आर्याने इरीनाकडून मोती घेतले. निक्की ते मोती आर्याकडून घेण्याचा प्रयत्न करत होती.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Kolkata Doctor Rape Case : “पब, बॉयफ्रेंडबरोबर नसूनही बलात्कार”, कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर मराठी कलाकरांचा राग अनावर, म्हणाले, “मुलीचा बाप…”

यावेळी निक्की व आर्या त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. आर्याकडून मोती हिसकावण्याच्या झटापटीत निक्कीकडून आर्यावर चावल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी निक्की तिला “चावते, चावते, हीच औकात आहे तुझी. कुत्री आहे तू” असं म्हटलं आहे. यावेळी वैभवने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. या खेळात निक्की, अरबाज, जान्हवी व सूरज यांच्या संघाने विजय मिळवला. ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो अधिकाधिक रंजक होत चालला आहे.   

आणखी वाचा – 70th National Film Awards : ७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, ‘कांतारा’ चित्रपटाने मारली बाजी, मराठीतील ‘वाळवी’ चित्रपटाला पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

दरम्यान,  ‘बिग बॉस’च्या घरामधील पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर झाली आहे. आता तिचा कॅप्टन्सीचा कालावधी संपला आहे. आता घरातील नवीन कॅप्टन होण्यासाठी सदस्य खूप प्रयत्न करत आहेत. कॅप्टन्सीसाठी आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. टास्क जिंकून ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामधील नवीन कॅप्टन कोण होणार, हे समजणार आहे.

Tags: Aarya Jadhavbigg boss marathi 5nikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update captaincy task Yogita Chavan, Janhvi Killekar and Nikk Tamboli fight for captainship.

Bigg Boss Marathi : जान्हवी-निक्कीने जमिनीवर ढकलून खेचताच योगिता भडकली, दोघींशी दोन हात करत बिनधास्त नडली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.