आयुष्यात सुख, दुःख सगळ्यांच्या आयुष्यात येत असतात. मेहनत करणं आणि जे हवं आहे ते मिळवणं या समीकरणातून आजपर्यंत कुणीही सुटू शकलं नाही. आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याच मान्यवर जे आज अप आपल्या क्षेत्रात अव्वल स्थानावर आहेत मग ते मनोरंजन असो राजकारण असो वा खेळ. या व्यक्तींनी आपल्या आयुष्यात एकेकाळी बराच स्ट्रगल केल्याचं सांगितलं जात. (Struggle Story Kiran Gaikwad)
आज अशाच एका कलाकारांची स्ट्रगल स्टोरी आपण जाणून घेऊयात. ज्याने मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं छोट्या पडद्यावर आपलं अस्तित्व सिद्द करून तो कलाकार आता त्याची प्रमुख भूमिका असलेल्या पहिला चित्रपटात झळकण्याची सज्ज झाला आहे तो कलाकार म्हणजे देव माणूस या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किरण गायकवाड.

आगामी ‘ चौक’ हा चित्रपट विशेष लक्षवेधी ठरतोय ते प्रवीण तरडे, रमेश परदेशी, उपेंद्र लिमये यांच्या सोबतच प्रमुख भूमिकेत दिसणार चेहरा ‘ किरण गायकवाड’ या नावामुळे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी ट्रेलर पाहून भारावलेला, भावुक झालेला किरण प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्याच्या या भावुकतेतून त्याच्या स्ट्रगल आज यशस्वी ठरला याच कुतूहल दिसत होत. त्याच्या या संघर्षाची कहाणी या वेळी सांगण्यात आली.
आधी हे काम करायचा किरण.. (Struggle Story Kiran Gaikwad)
या क्षेत्रात येण्या आधी किरण चौकाचौकात साउंड्स घेऊन जायचा त्यातूनच तो Dj वाजवायला देखील शिकला. या संदर्भात एक विशेष आठवण या वेळी सांगण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये यांच्या पुरस्कार पार्टीच्या सोहळ्यात गाणी वाजवली होती ती किरण ने. आवडत्या कलाकाराच्या सक्सेस पार्टीत गाणं वाजवणं ते त्याच्या सोबत प्रमुख भूमिकेतील चित्रपटात काम करणं हे किरण सोबतच अनेक जणांना प्रेरित करणार ठरेल एवढं नक्की.
हे देखील वाचा- ‘लोकनाट्याला उशीर झाला तरी चालेल पण याची चांगलीच जिरवायची…’ म्हणून दादा कोंडके यांनी जिरवली होती ‘त्या’ हॉटेल वाल्याची खोड
झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय ठरलेल्या मालिकां पैकी एक मालिका म्हणजे देव माणूस आणि देव माणूस भाग २ सुद्दा. मालिकेत प्रमुख पात्र साकारलं ते किरण ने. मालिकेची संपूर्ण कथा डॉक्टर साहेब या किरण ने साकारलेल्या खलनायिके भूमिके बद्दल फिरत होती. खलनायक हा मालिकेच्या शेवट पर्यंत हिरोच्या रोल मध्ये असणारी बहुदा ही पहिली मालिका असावी. ज्यामुळे किरण खलनायक असून सुद्दा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास यशस्वी ठरला. देवमाणूस मधला देवी सिंग उर्फ अजित कुमार देव ही भूमिका साकरण्याआधी किरण ने साकारलेली अजून भूमिका गाजली ती म्हणजे लागीर झालं जी या मालिकेतील भैयासाहेब ही भूमिका सुद्दा चांगलीच चर्चेत ठरली होती.(Struggle Story Kiran Gaikwad)