रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अजून एक आठवडा संधी मला मिळायला हवी होती”, पुरुषोत्तम दादा पाटील यांचं मोठं वक्तव्य, Bigg Boss Marathi काय निर्णय घेणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 12, 2024 | 2:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi season 5 purushottam dada patil big statement

'बिग बॉस मराठी'मध्ये पुन्हा येण्याची पुरुषोत्तम दादा पाटील यांनी व्यक्त केली इच्छा, काय होणार?

Bigg Boss Marathi season 5 :  ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व आता दुसऱ्या आठवड्यात येऊन पोहोचलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या पर्वाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. एका मागोमाग आलेले हे स्पर्धक एकमेकांच्या वरचढ ठरले. यंदाच्या पर्वात गायक, कीर्तनकार, अभिनेते, अभिनेत्री, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या सर्वांना संधी मिळाली. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढताना दिसत आहेत. पहिल्या आठवड्यात तब्बल १६ स्पर्धकांपैकी कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांना ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप द्यावा लागला. प्रेक्षकांनी दिलेल्या वोटींगनुसार पुरुषोत्तम दादा पाटील यांना कमी मत पडले आणि त्यांना ‘बिग बॉस’ला राम राम केलं.

‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये सहा सदस्यांपैकी वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण व धनंजय पोवार हे स्पर्धक सुरक्षित झाले आणि पुरुषोत्तम दादा पाटील या स्पर्धकाचा या घरातील प्रवास संपला. ‘बिग बॉस’च्या घरातून निघताना पुरुषोत्तम दादा यांच्या एका कृतीने समस्त महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मन जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेताना पुरुषोत्तम दादा यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संतांचा जयजयकार केला. त्यांच्या या कृतीने साऱ्यांची मन जिंकली आणि त्यांचं कौतुक करण्यात आलं.

आणखी वाचा – “भिकाऱ्यासारखं करतात, पॅडीचाही राग आला अन्…”, Bigg Boss Marathi बाबत अंशुमन विचारेचं स्पष्ट मत, म्हणाला, “माणुसकीपेक्षाही…”

View this post on Instagram

A post shared by Purushottam Dada Patil (@purushottam_dada_patil)

तर ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेत कोणताच स्पर्धक बाद झाला नाही. त्यामुळे सर्वांसाठी ही दिलासा देणारी बाब ठरली. अशातच पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या पुरुषोत्तम दादा पाटील या स्पर्धकाने सोशल मीडियावरुन केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत पुरुषोत्तम दादा पाटील यांनी “मला ‘बिग बॉस’च्या घरात अजून एक आठवडा संधी मिळायला पाहिजे होती. तुम्हाला काय वाटतं अवश्य सांगा”, असं म्हटलं आहे. पहिल्या आठवड्यात नॉमिनेट आणि दुसऱ्या आठवड्यात नॉमिनेट न केल्याने पुरुषोत्तम दादा पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखविली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीला खिलाडी म्हटल्यानंतर संपूर्ण ग्रुपचा अभिजीतवर राग, वादाला तोंड फुटणार, अंकिता म्हणाली, “आपलंच नाणं खोटं…”

पुरुषोत्तम यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपलं मत मांडलेलं दिसत आहे. “कोणाकोणाला वाटत आहे दादांबरोबर अरबाजने धोका केला”, “संधी मिळायलाच पाहिजे कारण ते असं झालं काही घडायच्या आतच होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे तुम्हालाही जास्त वेळ मिळाला नाही. वाईल्ड कार्ड एंट्री झाली पाहिजे असं माझं मत आहे”, “तुम्ही तीन महिने आत राहू शकला असतात दादा”, अशा अनेक कमेंट करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5purushottam dada patil stateme
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Saade Made Teen marathi movie sequel announced After 17 years know more about

पुन्हा एकदा ‘साडे माडे तीन’, तब्बल १७ वर्षांनी सिक्वेलची घोषणा, 'हा' मुख्य अभिनेता करणार दिग्दर्शन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.