Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच घरातील सदस्यांकडून वर्षाताईंचा वारंवार अपमान केला जात आहे. पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकर यांच्या कारकिर्दीचा, वयाचा मान न राखता त्यांना नको नको ते बोलली होती. त्यामुळे रितेशने ‘भाऊच्या धक्क्या’वर निक्कीची चांगलीच खरडपट्टी काढली. यांशीबाय तिला माफीही मागायला लावली होती. निक्की नंतर तिची मैत्रीण जान्हवी किल्लेकरने गेल्या आठडव्यात त्यांचा अपमान केला. जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात वादविवाद झाला. जान्हवी आर्याला निर्लज्ज म्हणाली. त्यावर वर्षाताई ‘निर्लज्जम समर्पयामी’ असं म्हणाल्या. हे ऐकताच जान्हवी, ‘ताई मी तुमचा पहिल्या दिवसापासूनच रिस्पेक्ट करत आलीये. माझ्या नादी लागू नका. तुमची घाणेरडी ऍक्टिंग मला दाखवू नका’ असं म्हणाली. यावर अनेकांनी संतप्त पोस्ट शेअर केल्या होत्या. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘बिग बॉस मराठी’ च्या माजी स्पर्धक सुरेखा कुडची यांनीही याबद्दल अआपला राग व्यक्त केला होता. अशातच आता त्यांनी नुकत्याच झालेल्या भाऊच धक्कामध्ये जान्हवीला भोवळ आली होती. यावर आपलं मतं मांडलं आहे. सुरेखा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जान्हवीच्या वागण्यावर आपलं मत मांडलं असून त्यांनी तिच्यावर खोचक पोस्टही शेअर केली आहे. हसावं की रडावं या शीर्षकाखाली त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुरेखा यांनी असं म्हटलं आहे की, “रितेशने आज एकीला झापलं. वर्षा उसगांवकरांचा अपमान केला तेव्हा डोळ्यातून दोन टिपूसही ओघळले नाहीत. पण वाईट वाटल्याचा अभिनय भारी होता. थोड्या वेळाने अक्षय कुमार आला तेव्हा अचानक मस्करीचा मूड. त्याचवेळी जेव्हा चुगली सांगितली गेली तेव्हा रितेशलाही खोटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात नवीन पाहुण्याची एण्ट्री होणार, कोण असणार ‘ती’ व्यक्ती? गाणं वाजलं अन्…
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “यावेळी आपल्या भाऊने भाऊचा धक्का दिला तो मला जाम आवडला. पण त्यानंतरचा मूड आणि चेहऱ्यावरचा जो रंग उडाला होता तो अरारा. ब्रेकमध्ये रडून झालं आणि अचानक पॅनिक अटॅकही आला. कारण निक्कीला समजलं तर… आणि थोड्या वेळाने परत डान्सही केला. हा संपूर्ण एपिसोड अर्ध्या तासात शूट झाला जातो, इतक्यात मूड बदलणे सोपं नाही बरं का? प्रश्न इतकाच आहे की यातलं खरं काय?”
आणखी वाचा – पॅडीचे कपडे फेकून दिले, अंकिताला जोरात बेडवर ढकललं आणि…; Bigg Boss Marathi च्या घरात निक्कीची दादागिरी
दरम्यान, सुरेखा यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेकांनी सुरेखा यांच्या या मताशी सहमती दाखवली आहे. त्याचबरोबर जान्हवी नाटकं करत आहे तिला ऑस्कर दिला पाहिजे, लोक बघत आहेत” अशा अनेक कमेंट्सद्वारे अनेकांनी जान्हवीवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.