श्रावण महिना सुरु झाला असून सर्वत्र नवोदित महिलावर्ग मंगळागौरीचे सण साजरे करताना दिसत आहेत. अनेक मालिकांमध्येही मंगळागौर अगदी धुमधडाक्यात साजरी होताना पाहायला मिळत आहे. तर प्रत्येकाच्या खऱ्या आयुष्यातही मंगळागौर साजरी करण्यात स्त्रिया व्यस्त असलेल्या पाहायला मिळत आहेत. अनेक कलाकार मंडळींनी ही त्यांची लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर साजरी केलेली पाहायला मिळाली. अशातच आता आणखी एका नवोदित विवाहित गायिकेने तिची मंगळागौरीची पूजा पार पाडली आहे. ही गायिका म्हणजेच सर्वांच्या मनावर राज्य करणारी मुग्धा वैशंपायन. (Mugdha Vaishampayan)
‘आमचं ठरलं’ म्हणत मुग्धाने काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली दिली. मुग्धा व प्रथमेश लघाटे यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर काही दिवसातच लग्नगाठही बांधली. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ चर्चेत आलेले पाहायला मिळाले आणि लग्नामुळे ही जोडी विशेष चर्चेतही आली. लग्नानंतर या जोडीने लगेचच कामालाही सुरुवात केलेली पहायला मिळाली. सोशल मीडियावर मुग्धा व प्रथमेश बऱ्यापैकी सक्रिय असतात.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारूमुळे अहिल्यादेवींनी खेळले मंगळागौरचे खेळ, दिशा-दामिनीला अद्दल घडविली अन्…
नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मंगळागौर पूजेचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि काही दिवसांपूर्वी तिने श्रावण महिन्यातील पूजेचेही प्रथमेश बरोबरचे काही फोटो शेअर केले होते. मंगळागौरीच्या या पूजेमध्ये मुग्धाचा खास पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे. प्रथमेश हा मूळचा कोकणातील अरवली येथील असल्याने मंगळागौरीच्या पूजेसाठी मुग्धा व प्रथमेश यांनी कोकण गाठलेलं दिसत आहे.
आणखी वाचा – पॅडीचे कपडे फेकून दिले, अंकिताला जोरात बेडवर ढकललं आणि…; Bigg Boss Marathi च्या घरात निक्कीची दादागिरी
कोकणात सासरच्या घरी जात मुग्धाने मंगळागौर पूजा पुजलेली आहे. सासरच्या मंडळींच्या समवेत मुग्धा ही पूजा करताना दिसत आहे. यावेळी मुग्धाच्या सासरी मंगळागौर पूजेसाठी तिची बहीण मृदुलही पोहोचली. मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाच्या अगदी १५ दिवस आधी मृदुलच लग्न झालं. दोघी बहिणींनी सुंदर अशी पोज देत फोटोही काढला. खासकरुन साडी, केसात गजरा, नथ यामध्ये ती अगदीच सुंदर दिसत होती.