Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, तिकडे दिशाच्या खोट्या वागण्यामुळे प्रीतम खूपच नाराज असतो. त्याला काय करावं कळत नाही. त्याच वेळेला तिथे प्रिया मॅडम येतात आणि विचारतात की, काय झालं आहे. त्यावर प्रीतम सांगतो की, मी खूप अपसेट आहे आणि मला जीव द्यावा वाटतोय, असं म्हणून तो स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. तेव्हा प्रियाला वाटतं की, प्रीतमने खरंच जीव दिला आहे. प्रीतमची घुसमट होत असल्याने प्रीतमने असं केलं आणि प्रीतमला वाचवण्यासाठी ती सुद्धा पाण्यात उतरते. मात्र प्रियाला पोहता येत नसतं. त्यावेळेला प्रीतमच प्रियाचा जीव वाचवतो. आणि तिला बाहेर आणतो.
तेव्हा पारू आदित्य दोघेही त्यांना आधी फ्रेश होऊन यायला सांगतात. पारू प्रियाला घेऊन स्वतःच्या घरी जाते आणि फ्रेश व्हायला सांगते. त्यानंतर प्रियाला तिच्या त्या मित्राचा फोन आलेला असतो. त्याच्याशी बोलत असताना इकडून प्रीतम सांगतो की, तुम्ही त्या प्रीतम सरांच्या जवळ तर नाही जात आहात ना. यावर प्रिया नाही असं म्हणते. प्रिया त्या मित्राशी पारूची ओळख करुन देते. तेव्हा पारू व प्रीतमला यापूर्वीच हे सगळं काही माहिती असतं. पारू प्रीतमची चांगली टेर खेचताना दिसतो. तर एकीकडे पारू व सावित्री यांनी मंगळागौरीच्या पूजेचा थाट घातलेला असतो.
अखेर मंगळागौरीची पूजा अहिल्यादेवींच्या सांगण्यावरून पूर्ण केलेली असते. हे पाहून दोघेही खूप खुश असतात. पारू सावित्रीचा आशीर्वाद घेते त्यावेळी तिथे दामिनी येते आणि ती हे सगळं काही पाहते. त्यानंतर दामिनी पारूला खेचत घेऊन अहिल्यादेवी समोर उभी करते आणि मंगळागौरीच्या पूजेबद्दल सांगते. मंगळागौरीची पूजा ही पारूच्या मैत्रिणीची आहे असं अहिल्यादेवी सांगतात मात्र दामिनी सांगते की, तिथे हिची कोणतीच मैत्रीण नव्हती. सावित्री व पारू होत्या. तेव्हा सावित्री अहिल्या देवीसमोर खोटं सांगते की, ही पूजा माझी आहे. भले माझा नवरा माझ्याबरोबर राहात नसला तरी आता त्यांची तब्येत थोडी खालावली आहे असं कानावर आलं. त्यामुळे त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी मी हे व्रत करायचं ठरवलं आहे. हे ऐकल्यावर अहिल्यादेवींच्या डोळ्यात पाणी येत. अहिल्या देवी म्हणतात की, इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस?, आता मंगळागौरीची पूजा तर झाली आहे. आता मंगळागौरीचे खेळ हे आज या बंगल्यात होतील असं म्हणून त्या आदेश देतात की चला तयारीला लागा. तर इकडे सावित्री पारूला भेटायला आलेली असते आणि पारू तिला मिठी मारते आणि सांगते की, तुमच्यामुळे ही मंगळागौरीची पूजा झाली.
यावर सावित्री सांगते की, पण आता मंगळागौरीचे खेळ आहेत काही झालं तरी तू दामिनी मॅडम समोर फुगडी घालायची नाही. मी त्यांच्या मंगळागौरीला पाहिलं आहे। त्या फुगडीचा वेग धरतात आणि हात सोडून देतात अशाने त्यांनी अनेक जणांना जखमी केले आहे. हे ऐकल्यावर पारूला कळत नाही की, त्या नेमक्या अशा का वागत आहेत. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात दिशा व दामिनी मिळून या मंगळागौरीच्या खेळांमध्ये कोणता अडथळा तर नाही आणणार ना हे पाहणं रंजक ठरेल.