Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला अधिक रंजक पद्धतीने सुरुवात झाली असून दिवसेंदिवस या शोमध्ये रंजकता येत आहे. बिग बॉसच्या नवीन पर्वाला सुरुवात होऊन आजचा घरातील तेरावा दिवस आहे. पहिल्या दिवसापासू घरात वाद, भांडणं व गॉसिप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. घरात नुकताच पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला असून यात कोकणची चेडवा अंकिता वालावालकर ही कॅप्टन झाली आहे. तेव्हापासून घरातील वातावरण थोडं बदलले आहे. अशातच कालच्या भागात या नॉमिनेशन टास्कवरुन घरातील सदस्यांमध्ये विचारविनिमय झाला. यावेळी घरात दोन गट पडल्याचे दिसून आले. यावेळी घरात अंकिता, धनंजय, निखिल, सूरज, पॅडी, अभिजीत, योगिता व आर्या यांचा एक ग्रुप होता तर तिकडे जान्हवी, अरबाज, घन:श्याम, वैभव, निक्की, इरीना व वर्षाताई यांचा एक ग्रुप पाहायला मिळाला. (Bigg Boss Marathi 5 Update)
यावेळी सर्व स्पर्धक घरात एके ठिकाणी बसलेले असताना या दोन्ही ग्रुपमध्ये काही कारणावरून मजामस्ती झाली. यावेळी धनंजय व पॅडी यांनी नक्कलही केली. यावेळी वर्षाताई कॅमेऱ्यासमोर काहीतरी बोलत असताना अंकिता आपल्या ग्रुपजवळ येऊन दोघींमध्ये (वर्षाताई व निक्की) अॅटिट्युड सारखाच असल्याचे म्हटलं. यावेळी धनंजय वर्षाताईंचा अॅटिट्युड जास्त असल्याचेही म्हटलं. याच पुढे अंकिताने “निक्कीची भाषा गचाळ होती. पण वर्षाताईंचा अॅटिट्युडही अधिक आहे” असं म्हटलं. पुढे वर्षाताई निक्की यांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसतात. तेव्हा निक्की वर्षा ताईंना “तुम्ही डगमगलात ते मला आवडलं” असं म्हणते.
तिच्या या वाक्यावर धनंजय निक्कीला “तू तिच्या छातीवर बस, तेव्हा तुझं समाधान होईल” असं म्हणतो. यावर वर्षाताई त्याला “तुला कुणी बोलायला सांगितलं आहे. माझं बोलणं चालू आहे. तू नंतर बोल” असं म्हणत त्याचा उर्मटराव म्हणून उल्लेख करतात. यावर घरातील सगळे सदस्य हसतात. याचाच राग येत धनंजयही “इथून जायच्या आधी एक दिवस तरी हिचा पाणउतारा करणार आहे’ असं म्हणतो. यापुढे योगिता त्याला “कशाला” असा प्रश्न विचारते. यावरतो “आजवर मी माझ्या वडिलांचं शिल्लक ठेवलं नाही” असं म्हणतो.
त्यामुळे आता धनंजय वर्षाताईंबद्दल हे असं का म्हणाला आणि तो नक्की त्यांना काय करणार आहे हे आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या कालच्या भागात टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसले. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसले. त्यामुळे कालचा भाग खूपच रंजक झाला