चित्र विचत्र अदा, पोज तर कधी वेगवेगळ्या डिझाइन्सचे कपडे यांमुळे अनेक कलाकार नेहमी चर्चेत राहतात.प्राजक्ता माळी, राखी सावंत, शिवाली परब, उर्फी जावेद, प्रिया बापट, सई ताम्हणकर यांसारख्या अनेक अभिनेत्री कायम कोणत्या ना कोणत्या विचित्र फोटोज साठी ट्रेंडिंग वर असतात. चर्चेच्या विषयांमध्ये नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर .(Saie Tamhankar Video Viral)

फोटो, पोज यासाठी प्रसिद्ध होणं हे सई साठी नवीन नाही पण आता सई चर्चेत आलीये ते तिच्या झटका डान्स साठी. या नवीन डान्स स्टाईल मधील एक व्हिडिओ सई ने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून शेअर केला आहे.
या व्हिडिओ मध्ये सई झटके यावेत तशी नाचताना दिसत आहे. या व्हिडिओ वर चाहत्यांनी देखील ‘ जरा सांभाळून मॅडम ड्राइवर वर बसायची एखादी’ अशा अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी सईच्या या डान्सला ‘ खड्डा डान्स’ असं देखील नाव दिल आहे.

सई नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कपड्यांमधील फोटोशूट साठी चर्चेत असतात साडी असो व वेस्टर्न पॅटर्न्स कोणत्याही कपड्यांमध्ये सायीचं सौंदर्य चाहत्यांना भुरळ पाडतं.(Saie Tamhankar Video Viral)
हे देखील वाचा – चित्रपटाला प्राईम टाईममध्ये लवकरात लवकर स्क्रीन उपलब्ध करून द्या……TDM चित्रपटासाठी अजित पवारांची थिएटर मालकांना तंबी