राजकारण आणि मनोरंजन हे क्षेत्र दिसताना एकमेकांपेक्षा दिसायला वेगळी असली तरी कोणत्याना कोणत्या करणारे एकमेकांशी जोडली जातात. आता सध्या आणखी एका कारणामुळे राजकारण आणि मनोरंजनविश्व एकत्र आल्याचं पाहिलंय मिळतय. भाऊराव कऱ्हाडे दिगदर्शित TDM चित्रपटाला शोज न मिळाल्यामुळे कलाकार आणि संपूर्ण टीम भावुक झाल्याचं पाहायला मिळाली. या समस्येवर आता राजकीय पटलावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत ज्या मध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुढाकार घेऊन ट्विट करत चित्रपटाला शोज मिळण्याबाबत आपलं मत स्पष्ट केलं आहे.(Ajit Pawar on TDM)
अजित पवार ट्विट करत म्हणाले ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी.’ असं म्हणत अजित पवार यांनी मराठी चित्रपट आणि दिगदर्भकासाठी धाव घेतली आहे.
नक्की काय घडलं?(Ajit Pawar on TDM)
चित्रपटाबाबत काय घडलं हे सांगताना भाऊराव कऱ्हाडे म्हणाले ‘ ‘आज ‘टीडीएम’ चित्रपट लोकांना आवडतोय आणि लोक हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त ही करतायत मात्र चित्रपटगृहात शो नसल्याकारणास्तव मराठी प्रेक्षकांवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर हा अन्याय होतोय. मला कुठेतरी वाटतंय की हे सर्व चित्र पाहून मराठी सिनेमा संपतोय, किंवा संपवला जातोय. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही. आम्ही असं म्हणत नाही आमचा सिनेमा चांगला आहे, पण सिनेमाला प्रेक्षक प्रतिसाद देत असताना शो रद्द करणं हे कितपत योग्य आहे. (Ajit Pawar on TDM)
परवा पासून पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात एक शो होता, काल दोन शो होते चित्रपट गृह तुडुंब भरलेले असताना ही वाढवून शो दिलाच नाही. लोकांना चित्रपट पाहायचाय त्यांची मागणी आहे, म्हणून मी स्वतः थेटर मालकांजवळ विचारपूस केली तर त्याच असं म्हणणं आहे की एकच शो लावा असा वरून प्रेशर आहे. माझ्या चित्रपटाला जे शो मिळाले आहेत ते पण प्राईम टाईम मधील नसून ऑड टाईममधील आहेत, आणि ऑड टाईम असल्यामुळे प्रेक्षकांना त्या वेळेत तिथवर पोहोचणं शक्य नाही आहे आणि हे सर्व पाहून आम्हाला खूप त्रास होतोय. माझा चित्रपट नसेल आवडला तर स्पष्ट मला लोकांनी सांगावं की, तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस त्या दिवशी मी सिनेमा निर्मितीच काम बंद करेन’. असं म्हणून भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले.