रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : सूरज, पॅडी, निखिल व योगितावर नॉमिनेशनची टांगती तलवार, घरातील स्पर्धकांकडूनच झाले नॉमिनेट, कोण जाणार घराबाहेर?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 8, 2024 | 9:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update Pandharinath Kamble, Suraj Chavan, Nikhil Damle, Yogita Chavan, Ghanshyam Darwade and Nikki Tamboli six contestants in nomination task

Bigg Boss Marathi 5 च्या घरातील एकूण सहा स्पर्धक झाले नॉमिनेट, नक्की कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss Marathi 5 update : बिग बॉस आणि नॉमिनेशन हे जणू एक समीकरणच आहे. घरातील सदस्य स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. याचसाठी तो घरातील इतर सदस्यांना नॉमिनेट करत असतो. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या कालच्या भागातदेखील ही प्रक्रिया पार पडली असून यात सूरज, पॅडी, निखिल, योगिता, निकी5व घन:श्याम हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. काल पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील १५ स्पर्धकांनी या सहा जणांना नॉमिनेट केलं आहे. बिग बॉसने दिलेल्या टास्कनुसार घरातील बाकी सदस्यांनी या सहा जणांचे नाव नॉमिनेशनच्या यादीत टाकले आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांच्या जोड्या केल्या होत्या आणि त्यांना दिलेल्या बीबी करन्सीमधून घरात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यास सांगितली होती. या टास्कनुसार घरातील १५ स्पर्धकांमध्ये एकूण ०७ जोड्या केल्या गेल्या आणि उरलेली एक सदस्य ही अंकिता म्हणजेच घराची कॅप्टन होती. (Bigg Boss Marathi 5 update)

टास्कनुसार सर्वांनी बीबी करन्सीमध्ये आणि घरात उपयोगी पडतील अशा वस्तूंची खरेदी केली. यात खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून टॉयलेट व बाथरुमचीही खरेदी केली गेली. त्यानंतर बिग बॉसने टास्कमध्ये ट्विस्ट आणत ‘ज्याची जास्त चर्चा त्याचा नंबर वरचा’ हा नवीन टास्क दिला. म्हणजेच या टास्कमध्ये घरातील प्रत्येक स्पर्धक जोडीने घरात कमी लागणाऱ्या वस्तूं व घरात कमी चर्चा असणाऱ्या स्पर्धकांना नॉमिनेट करायला सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा : 08 August Horoscope : मेष कर्क व मीन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस भाग्याचा, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार, जाणून घ्या…

या नवीन ट्विस्टनुसार, घरातील स्पर्धकांनी अनुक्रमे पॅडी-योगिता, सूरज-निखिल व घन:श्याम-निक्की या तीन जोड्यांची नावं घेतली. त्यामुळे आता हे सहा सदस्य घरातील  नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत असा निर्णय बिग बॉसने दिला आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी या निर्णयाबरोबरच प्रेक्षकांच्या वोटिंगनुसारच कुणीतरी एक स्पर्धक घराबाहेर जाऊ शकतो हेदेखील नमूद केलं आहे.

आणखी वाचा : “काहीही दाखवतात आणि…”, अधिपतीची खरी आई म्हणून भूवनेश्वरीला दाखवल्यानंतर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “हे बघायचं राहिलं होतं…”

त्यामुळे आता घराबाहेर जाण्याच्या शर्यतीत तर पॅडी, सूरज, निखिल व योगिता हे स्पर्धक असले तरी अंतिम निर्णय हा स्पर्धकाला मिळणाऱ्या वोटिंगच्या आधारे घेतला जाणार आहे. त्यामुळे घराबाहेर नक्की कोण जाणार? हे येत्या शनिवारी-रविवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: Nikhil DamlePandharinath KambleSuraj ChavanYogita Chavhan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 update arya jadhav and vaibhav chavan

Bigg Boss Marathi : आर्या रांगडा गडी वैभवच्या प्रेमात, व्यक्त होताना ढसाढसा रडली, एकतर्फी प्रेमाची सुरुवात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.