रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा संपन्न, Ex-boyfriend म्हणत शेअर केले फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 6, 2024 | 12:04 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Heymal Ingley tied the knot with her boyfriend Ronak and she shared engagement photos on social media

मराठी अभिनेत्री हेमल इंगळेने गुपचूप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Heymal Ingley Engagement : आयपीएएल २०२४ मध्ये एका अँकरने सर्व क्रिकेटप्रेममींचे लक्ष वेधलं होतं ही अँकर म्हणजे मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळे. हेमल इंगळे ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जी मराठी चित्रपटांमध्ये काम करते. हेमल इंगळेने मराठीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. हेमलने एका हिंदी टीव्ही शो आणि एका हिंदी वेब सीरिजमध्येही काम केले आहे. आपल्या निरागस हास्याने व मनमोहक सौंदर्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याऱ्या हेमलने नुकताच साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास फोटो शेअर करत तिच्या साखरपुड्याबद्दलची माहिती दिली आहे. (Heymal Ingley Engagement)

‘अशी ही आशिकी’ या चित्रपटामुळे हेमल इंगळे घराघरांत लोकप्रिय झाली. या चित्रपटात तिने अभिनय बेर्डेबरोबर स्क्रीन शेअर केली होती. सध्या हेमल तिच्या आगामी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये अभिनेत्रीला दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. अशातच आपल्या कामांमुळे चर्चेत असणाऱ्या हेमलने तिच्या चाहत्यांना साखरपुड्याचा फोटो शेअर करत सुखद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Heymal Ingley (@hemalingle)

आणखी वाचा – Satvya Mulichi Satavi Mulgi : देवीआईच्या देवळातच नेत्राने दिला जुळ्या मुलांना जन्म, तिथेच विरोचकाचा वध होणार, प्रोमो व्हायरल

हेमलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचे फोटो शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये हेमलने  निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस, गळ्यात छानसा नेकलेस असा लूक केला आहे. तर तिच्या होणऱ्या नवऱ्यानेही तिच्या ड्रेसच्या रंगाला साजेसा कुर्ता परिधान केला आहे. हेमलच्या नवऱ्याचं नाव रोनक असं आहे. होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा रोमँटिक फोटो शेअर करत तिने साखरपुड्याची गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्रीने आयुष्याच्या या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. हेमलने शेअर केलेल्या या फोटोखाली तिच्या अनेक चाहत्यांसह मराठी कलाकारांनीही कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “बुक्कीतच मुंडी छाटेन” वैभवने सूरज चव्हाणला डिवचलं, तोही भडकला, म्हणाला, “हात लावून तर बघ”

श्रिया पिळगांवकर, रिंकू राजगुरु, फुलवा खामकर, स्वप्नील जोशी, रसिका सुनील यांसारख्या अनेक कलाकारांनी अभिनंदन म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.  दरम्यान, आपल्या कौशल्याने आणि स्टायलिश लूकने हेमल इंगळेने २०२४ च्या आयपीएल सीझनमध्ये धुमाकूळ घातला आहे. मैदानावरील षटकार आणि चौकारांसह पडद्यावरील हेमलच्या अँकरिंगने प्रेक्षकांची मने जिंकली. हेमलने प्रथमच क्रिकेटमध्ये अँकरिंग केले होते. अशातच ती आता लवकरचं नवरा माझा नवसाचा २ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज आहे.   

Tags: Heymal IngleyHeymal Ingley Engagementmarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kangana Ranaut on Bangladesh PM

बांगलादेशमधील आंदोलकांनी लुटलं पंतप्रधान शेख हसीनाचं घर, भारतात आल्या अन्…; कंगना रणौत म्हणाली, "मुस्लिम देशांमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.