शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 च्या घरात Captaincy साठी स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली, एकमेकांच्या अंगावर धावून गेले अन्…; कोण होणार Captain?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 6, 2024 | 9:44 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 first captaincy task in the house and fight between the contestants to become the captain.

Bigg Boss Marathi 5 च्या घरात रंगला पहिला कॅप्टन्सी टास्क, नक्की कोण होणार कॅप्टन?

Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस’च्या घरात ‘कॅप्टन’ला खूप महत्त्व आहे. ‘बिग बॉस’च्या घरात तो खूप महत्त्वाची भूमिका निभवतो. मात्र ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात गेल्या आठडव्यात कुणीही स्पर्धक कॅप्टन बनला नव्हता. नियम मोडल्यामुळे ‘बिग बॉस’ ने शिक्षा दिली होती आणि त्यांनी दिलेल्या शिक्षेमुळे पहिल्या आठवड्यात कुणीही कॅप्टन बनलं नव्हतं. मात्र ‘बिग बॉस’च्या घरातील दुसरा आठवडा सुरू झाला असून या आठडव्याच्या सुरुवातीलाच घरातील कॅप्टन्सी पदासाठी टास्क होणार आहे आणि या कॅप्टन्सी पदासाठीच्या टास्कचा एक नवीन प्रोमो भेटीला आला आहे. (Bigg Boss Marathi 5 first captaincy)

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यात कॅप्टन पदासाठीची मारामारी पाहायला मिळत आहे. ‘कॅप्टनची बुलेट ट्रेन’ असं या टास्कचं नाव असून या ट्रेनमध्ये कॅप्टन बनण्यासाठीची एक सीट आहे आणि ही सीट जो मिळवेल किंवा या सीटवर जो कुणी बसेल त्याला ‘बिग बॉस’च्या घरातील कॅप्टन पद मिळेल असं या प्रोमोवरुन कळत आहे. मात्र ‘बिग बॉस’च्या घरातील कॅप्टनचे पद मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये खूपच रेटारेटी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा करत आहे प्राजक्ता माळी, नाशिकला पोहोचली अभिनेत्री, म्हणाली, “महादेवांकडे प्रार्थना आहे की…”

या प्रोमोमध्ये अरबाज व अभिजीत यांच्यात सीट मिळवण्यासाठी रेटारेटी होत असून अंकिता “बिग बॉस मला hurt (दुःख) होत आहे” असं म्हणताना दिसत आहे. तसंच अरबाज हा खूपच आक्रमक होत असल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. आक्रमक होताना तो “आता तुम्ही सगळे बघणार की, मी इथे कुणाला बसू देणार नाही.” त्यानंतर इरिना व सूरजदेखील खूप आक्रमक झाल्याचं या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – 06 August Horoscope : मेष, वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस आहे खास, धनलाभाचे आहेत योग, जाणून घ्या…

त्यामुळे आता या कॅप्टन्सीच्या पदासाठीच्या लढतीत कोणता स्पर्धक बाजी मारणार? आणि कोण या घराचा पहिला कॅप्टन होणार? त्याच्याशिवाय या कॅप्टन्सी पदासाठीच्या लढतीत कोण कुणावर भारी पडणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi NewsBigg Boss Marathi 5 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
paaru marathi serial todays update

Paaru Marathi Serial : अखेर अहिल्यादेवी व पारूच्या व्रताला यश, आदित्यचा जीवही वाचला अन्…; पारूने दिली आदित्यवरील प्रेमाची कबुली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.