Bigg Boss Marathi suraj chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणच्या एण्ट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहते. तर या टिक टॉक स्टारच्या एण्ट्रीने सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे. त्याच्या निवडीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं दिसलं. तर घरातील स्पर्धकांनाही सूरजची एण्ट्री खटकली. मात्र सूरजच्या एण्ट्रीनंतर संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी त्याला खूप पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला. साध्या घरातला मुलगा सोशल मीडियामुळं ‘बिग बॉस’च्या घरापर्यंत पोहोचू शकतो, हे त्यानं दाखवून दिलं आणि अनेकांची मन जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर सूरजने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. त्यानंतर आता थेट त्याच्या कुटुंबाने सूरजच्या एण्ट्रीनंतर भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे.
“‘जाहीर सभा’ या युट्युब चॅनेलला ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील सूरज चव्हाणच्या कुटुंबाने मुलाखत दिली. यावेळी बोलताना सूरजच्या बहिणीने त्याच्या एकंदरीत ‘बिग बॉस’मधील प्रवासाबाबत भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना सूरजची बहीण म्हणाली, “आम्हाला त्याला टीव्हीवर पाहून खूप आनंद होत आहे. त्याचं पुन्हा बदललेलं नशीब पाहून खूप भारी वाटत आहे. टिक टॉक बंद झाल्यानंतर त्याची प्रसिद्धी कमी झाली होती. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजला पाहून सगळ्यांना शॉक बसला आहे. त्याला ‘बिग बॉस’च्या टीमकडून फोन आला तेव्हा त्याने मला सांगितलं. आणि त्याने मला बोलायला सांगितलं. सुरुवातीला मला खरं वाटत नव्हतं”.
पुढे ती म्हणाली, “आमची पहिल्यापासून गरीब परिस्थिती होती. आमच्या एका बहिणीचे पती वारल्यानंतर तिच्या काळजीपायी वडिलांनी धसका घेतला. त्यानंतर त्यांना कॅन्सर या आजाराने गाठलं. वर्षभर ते उपचार घेत होते. आणि अचानक त्यांनी या गोष्टीचा धसका घेतला. सूरज हा एकुलता एक असल्याने लाडका होता. आमची आई शिकलेली नसली तरी त्याला मारुन ती शाळेत पाठवायची. सुरुवातीला सूरजने गवंडी काम केलं. आणि आता सूरजला इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर त्या घरात एकत्र पाहून खूप आश्चर्य वाटत आहे.
पुढे सूरजची बहीण असंही म्हणाली आहे की, “ट्रोलिंगबाबत सूरज म्हणायचं की, मला काही वाचायला येत नाही त्यामुळे प्रश्नच नाही. कमेंट करणारे करतच राहतात. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि त्याचं कमेंट करणाऱ्या सर्व लोकांच्या त्याने चप्पल तोंडात मारली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आणि अजून एक कमेंट करणाऱ्या लोकांना मी सांगेन की, तो कसा का असेना तिथवर पोहोचला आहे, आणि त्याने हे करुन दाखवलं आहे. तुमची तितकी लायकी पण नाही. शिवाय त्याच्या बहिणीने तो थोडा रागीट आहे. आणि त्याला वाचता येत नाही म्हणून त्याला समजून घ्या असं म्हणत काळजी व्यक्त केली आहे”.