सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : “एक नंबर भाऊ”, रितेश देशमुखच्या होस्टिंगवर कलाकारांसह प्रेक्षकही खुश, कौतुक करत म्हणाले, “अख्ख्या महाराष्ट्राला…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 4, 2024 | 9:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Riteish Deshmukh's hosting appriciated by audience and artists

Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखच्या होस्टिंगला प्रेक्षक व कलाकारांची पसंती

‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाचा पहिलाच शनिवार चांगलाच गाजेल असे चित्र आहे. पूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘चावडी’वर स्पर्धकांची शाळा घ्यायचे, आता रितेश ‘धक्क्या’वर सर्वांना धक्के देणार आहे. आधीच्या ‘बिग बॉस मराठी’च्या सीझन्समध्ये असणाऱ्या ‘बिग बॉस चावडी’ची जागा यंदा ‘रितेश भाऊच्या धक्क्या’ने घेतली आहे आणि या पहिल्याच धक्क्यावर निक्की तांबोळीची शाळा घेतली जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही’ असं रितेशने तिला सुनावलं आहे. महाराष्ट्रातील जनतेचा ‘भाऊ’ म्हणून लोकप्रिय असलेला रितेश पहिल्यांदाच अशाप्रकारे कुणावर तरी चिडलेला पाहायला मिळाले.

रितेशच्या या ‘भाऊच्या धक्क्या’वर घरातील उद्धट सदस्यांचा पाणउतारा केला जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. ‘बिग बॉस मराठी’च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने व डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर तिचा माज उतरवणार असल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : निक्की तांबोळीचा पत्ता कट?, रितेश देशमुखचा राग अनावर, माफीही मागायला लावली अन्…; व्हिडीओ व्हायरल

या प्रोमोद्वारे अनेक कलाकार व प्रेक्षकांनी रितेशचे कौतुक केलं आहे. अनेकांना रितेशचा हा दरारा चांगलाच आवडला आहे, अनेकांनी त्यांच्या या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे व्यक्त केल्या आहेत. “एक नंबर, हेच बघायला होतं पूरण महाराष्ट्राला”, “आता सगळ्यांचा माज उतरणार”, “मराठी लोकाचा छावा फक्त आणि फक्त रितेश सर”, “प्रेक्षक याचीच सात दिवस झाले वाट बघत आहेत”, “एक नंबर”, शेवटी प्रश्न मराठी अस्मितेचा आहे”, “वाह रितेश भाऊ वाह… हेच अपेक्षित होत”, “हिंदी चित्रपटात काम करूनदेखील रितेश सरांना मराठीचा अभिमान आहे” अशा अनेक कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळीच्या भांडणावर किशोरी शहाणेंनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या, “आदर न देता…”

दरम्यान, गेले काही दिवस निक्की व वर्षा यांचे भांडण चांगलेच चर्चेत आहे. या भांडणामुळे निक्कीला अनेक कलाकार व नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे सुनावले. मात्र रितेश यावर काय भूमिका घेणार? याची सर्वजण वाट पाहत होते. रितेश देशमुख यांचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. रितेशचा हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून त्याची एक वेगळीच स्टाइल प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या भागासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli apologized to Varsha Usgaonkar and every Marathi manus of Maharashtra

Bigg Boss Marathi 5 : अखेर ‘बिग बॉस’ने निक्कीचा माज उतरलावच, सर्वांसमोर वर्षाताईंची मागितली माफी, म्हणाली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.