Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या पर्वात अनेक भांडणं व वाद झाले. या भांडणात निक्कीने वर्षा उसगांवकरांचा अपमान केला होता. या भांडणात तिने वर्षाबरोबर केलेल्या वर्तणूकीमुळे निक्कीवर अनेक कलाकार व प्रेक्षकानी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. मात्र या साऱ्यावर रितेश देशमुख काय प्रतिक्रिया देणार? ते निक्कीला काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे स्पर्धक व कलाकार शनिवार व रविवारच्या भागांची आतुरतेने वाट बघत होते. अशातच आज रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर सर्वांची शाळा घेणार आहेत, यावेळी ते निक्कीसह सर्वच स्पर्धकांना ओरडणार आहेत. याचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यात ते निक्कीला माफी मागायला सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे, (Bigg Boss Marathi 5 New Promo)
“‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही”, असं म्हणत रितेशने ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्यावर’ निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहे. पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोडंचं पाणी पळालं आहे. तर काहींच्या काळजाचं पाणीपाणी झालं. रितेशच्या या ‘भाऊच्या धक्क्या’वर घरातील उद्धट सदस्यांचा पाणउतारा केला जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. ‘बिग बॉस मराठी’च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने व डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर तिचा माज उतरवणार असल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.
निक्की तांबोळी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला, “वर्षां ताईंबरोबर ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही. त्यांचं कतृत्व, काम याचा आदर झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केला आहे.”
रितेश पुढे म्हणाला, “’बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही. त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार?” रितेशचा हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून या आठवड्यात रितेशचा एक वेगळाच अंदाज व होस्टिंगची त्याची एक वेगळीच स्टाइल प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या भागासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.