शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “खड्डे, बेशिस्तपणा आणि…”, रस्त्यावरील ट्रॅफिकला वैतागला शशांक केतकर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “लोकांचा जीव, वेळ…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 3, 2024 | 3:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shashank Ketkar muramaba serial fame marathi actor expressed his anger about the traffic on the thane ghodbandar road

शशांक केतकरने रस्त्यावरील ट्रॅफिकबद्दल व्यक्त केला संताप

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आजूबाजूच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवरही भाष्य करत असतात, अशा काही कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका मांडत असतो. याआधी त्याने अनेकदा त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका सोशल मीडिया किंवा मुलाखतीच्या मध्यायातून व्यक्त केल्या आहेत. अशातच त्याने नुकतीच ठाणे घोडबंदर रस्त्यावरील ट्रॅफिकबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे.

शशांकने एक व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “मीरारोड आणि ठाण्याच्या मध्ये लोणावळ्याचा फील येण्यासाठी ही योजना आखलेली आहे. खरंतर मला याचा अर्थच कळत नाही. म्हणजे सिग्नल चांगले लावून त्याचा खर्च वाचवण्यापेक्षा, रस्त्यात खड्डे आणि चुकीच्या मार्गावरुन येणाऱ्या गाड्या आणि गैरशिस्तपणा यामुळे सिग्नलचं एक वेगळंच काम आपल्याकडून केलं जात आहे. ही दूरदृष्टी आपल्याच देशात आहे. मला फार बरं वाटत आहे की, सिग्नलचा खर्च, खड्ड्यांमुळे स्पीडब्रेकर्सचा खर्च वाचतो. या सर्वासाठी एक वेगळीच दृष्टी लागते. लोकांचा जीव, वेळ हे काय तसं फारसं महत्त्वाचं नाही. मला पण असं वाटत आहे की, माझी गाडी इथेच उभी करुन मी पण शूटिंगसाठी चालत गेलं पाहिजे.  कारण रात्री ९-१० पर्यंत या गाड्या इथून हलणार नाहीत”.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

आणखी वाचा – Paaru Serial : आदित्यला मारण्यासाठी दिशाचा मोठा प्लॅन, पारू व अहिल्यादेवी करत असलेला व्रत फायदेशीर ठरणार का?, नवा ट्वीस्ट

शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो स्वत: रस्त्याच्या मधोमध इतर गाड्यांमध्ये अडकलेला दिसत आहे. त्याच्या मागे व पुढे अशा अनेक गाड्या आहेत. अक्षरश: रस्त्यावर लांबलांब पर्यंत गाड्या उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. याच गंभीर परिस्थितीवर शशांकने सोशल मीडियाद्वारे त्याची भूमिका व्यक्त केली आहे. या व्हिडीओखाली त्याला अनेकांनी या समस्येबाबत पाठींबाही दिला आहे. त्याने मांडलेली बाजू ही खरी असून अनेकांनी त्यांना या समस्येला रोज भोगावे लागत असल्याचे म्हटलं आहे. शशांकने याआधी अनेकदा राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर त्याने त्याच्या भूमिका व्यक्त केल्या आहेत. अशातच त्याने ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकबद्दलची समस्या व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : वर्षाताईंचा अपमान होताच निक्कीवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, म्हणाला, “आतापर्यंतचा सर्वात वाईट स्पर्धक…”

दरम्यान, शशांक केतकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे तो जितका चर्चेत राहत असतो. तितकाच तो सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करत चर्चेत राहत असतो.   

Tags: marathi entertainment newsshashank ketkarThane Ghodbunder Road Traffic
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
bigg boss marathi season 5 riteish deshmukh

Bigg Boss Marathi : "खूप अपेक्षा आहेत…", स्पर्धकांची शाळा घेणार रितेश देशमुख, नव्या गाण्याचा प्रोमो समोर येताच प्रेक्षक म्हणाले, "तुम्ही चुकीचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.