रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुझी काम तूच कर…”, सूरज चव्हाणने निक्की तांबोळीला तिच्याच शब्दात दिलं तोडीस तोड उत्तर, म्हणाला, “तू इथेच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 3, 2024 | 3:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss marathi season 5 nikki tamboli and suraj chavan

'बिग बॉस मराठी' सिझन ५ मध्ये सुरज चव्हाणचे निक्की तांबोळीला सडेतोड उत्तर

Bigg Boss Marathi season 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. यंदाच्या या पर्वात रील स्टार यांची धमाल मस्ती पाहायला मिळत आहे. रील स्टार यांच्या दमदार एण्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामध्ये टिक टॉक स्टार सूरज चव्हाणची एण्ट्री अनेकांना भावली आहे. सूरज चव्हाणच्या एण्ट्रीनंतर ‘बिग बॉस’मधील स्पर्धकांना ते आवडलं नाही. सुरुवातीला सूरज स्पर्धकांशी बोलायला, त्यांच्याशी जुळवून घ्यायला घाबरत होता हे पाहून स्वतः ‘बिग बॉस’ यांनीच सूरजला खेळ खेळायला उत्स्फूर्त केलं.

सूरजला ‘बिग बॉस’ एका बंद खोलीत बोलावतात आणि सांगतात की, “सूरज न घाबरता खेळायचं”. सूरजला ‘बिग बॉस’ यांनी खंबीर होण्यास आणि हा खेळण्यास धीर दिलेला आहे. यावर सूरज असं म्हणतो, “आता मी कोणाला घाबरणार नाही. कारण जो घेतो टीम तो होतो किंग. कारण मी आहे गोलीगत टॉपचा किंग”, असं म्हणत तो त्याच्या युनिक स्टाइलने पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री घेतो. सूरजचा हा बदलता स्वभाव आता घरातील इतर स्पर्धकांना भारी पडणार आहे.

आणखी वाचा – Paaru Serial : आदित्यला मारण्यासाठी दिशाचा मोठा प्लॅन, पारू व अहिल्यादेवी करत असलेला व्रत फायदेशीर ठरणार का?, नवा ट्वीस्ट

नुकत्याच समोर आलेल्या भागात असं पाहायला मिळत आहे की, निक्की सूरजला म्हणते, “हे मेकअपचं सामान जरा तिकडे घेऊन चल ना. तिकडे म्हणजे वॉशरुममध्ये”. हे ऐकून सूरज म्हणतो, “अगं इथेच असुदे. खाली बसून तू इथेच मेकअप कर. हे आपलं घर आहे”. यावर निक्की त्याला सांगते की, “मी शॉर्ट्स म्हणजे छोटे कपडे घातले आहेत म्हणून मी खाली बसू शकत नाही. चल ना हे जरा पडेल”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : वर्षाताईंचा अपमान होताच निक्कीवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, म्हणाला, “आतापर्यंतचा सर्वात वाईट स्पर्धक…”

यावर सूरज तिला म्हणतो, “शॉर्ट्स मोठे घालत जा”. तेव्हा निक्की मेकअपचा एक पाऊच घेऊन सूरजजवळ येते आणि म्हणते, “सर्व नको हे एक पकड”. त्यावर सूरज उत्तर देत म्हणतो, “तुझी काम तूच करत जा”. यावर धनंजय सूरजचं कौतुक करत म्हणतो, “हे एकदम तू बरोबर बोलला आहेस”. तेव्हा निक्की सूरजला म्हणते, “हे माझं वैयक्तिक काम आहे. घराचं नाही आहे”. तेव्हा सूरज निक्कीला तोडीस तोड उत्तर देत म्हणतो, “वैयक्तिक कामं स्वतःची स्वतः करायची. घराचं असतं तर मी स्वतः तुझ्याबरोबर आलो असतो”.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5Suraj Chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shashank Ketkar muramaba serial fame marathi actor expressed his anger about the traffic on the thane ghodbandar road

Video : "खड्डे, बेशिस्तपणा आणि...", रस्त्यावरील ट्रॅफिकला वैतागला शशांक केतकर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "लोकांचा जीव, वेळ..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.