Bigg Boss Marathi 5 Update : संघर्ष हा कधी कुणाला चुकलेला नाही. पण या संघर्षावर मात करत, आपल्या आयुष्यातील दु:ख विसरुन इतरांच्या चेहऱ्यावर जो हास्य आणण्याचे काम करतो आणि यशाची शिखरे गाठतो तोच खरा कलाकार. असाच एक अतरंगी कलाकार म्हणजे सुरज चव्हाण. आपल्या अतरंगी, विनोदी धाटणीच्या व्हिडीओमुळे सूरज चव्हाण अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. मोबाइलवर व्हिडीओ करणाऱ्या सुरजने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. आपल्या खास शैलीने व्हिडीओ करणारा सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सूरज चव्हाणच्या ‘बिग बॉस’च्या घरातील एण्ट्रीमुळे अनेकांना आश्चर्य वाटले. पण त्याचा इथपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक कठीण परिस्थितीवर मात करत तो इथपर्यंत आला आहे. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)
बारामती तालुक्यातील मोडवे गावचा रहिवासी असलेल्या सूरज चव्हाणचे आयुष्य खूपच खडतर आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. आई-वडील गेल्यानंतर त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. आई-वडील गेल्यानंतरच्या त्याच्या याच परिस्थितीबद्दल स्वत: सूरजने सांगितलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या वडिलांच्या निधनाबद्दल व त्याला आईची आठवण येत असल्याचे म्हटलं आहे. यावेळी सूरजला अश्रुही अनावर झाले.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनेच फसवलं, दुसऱ्याच मुलीबरोबर पकडलं अन्…; म्हणाली, “माझ्या आयुष्यामध्ये…”
या व्हायरल व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “बाप मेला तेव्हा मी गोट्या खेळत होतो आणि कुणीतरी येऊन सांगितलं की, तुझा आप्पा गेला. तेव्हा पळत पळत घेरी गेलो. वडील गेलेले असूनही मला रडायलाच आलं नाही. माझ्या डोळ्यांतून तेव्हा पाणीचं आलं नाही. त्यामुळे मला गाववाल्यांनी नावं ठेवली”. यापुढे सुरजने त्याच्या वडिलांबद्दल असं म्हटलं की, “माझ्या आप्पांनी सर्वांना सढळ हाताने मदत केली. दारावर कुणीही गरीब माणूस आला तर जेवत्या ताटावरुन उठून मदत केली. स्वत: उपाशी राहून तो त्याला जेवायला देत असे. असा माझा बाप होता. याचं मला आता वाईट वाटतं आहे”.
आणखी वाचा – हनिमूनवरुन घरी परतले अधिपती-अक्षरा, भूवनेश्वरीला घराबाहेर काढल्याचे सत्य समजताच वडिलांची कॉलर पकडली अन्…
यापुढे सूरजने यामुळे मला आता काही खाऊ-पिऊ वाटत नसल्याचे म्हटलं आहे. तसंच मला आईची आठवण येत असल्याचेही त्याने सांगितलं. दरम्यान, गरीबी व हलाखीच्या परिस्थितीमुळे सुरजने त्याचं शालेय शिक्षणही पूर्ण केलं नाही. त्याने फक्त आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मोलमजुरी करत घराची परिस्थिती सांभाळली.