Tula Shikvin Changlach Dhada : झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. मालिकेत रोज एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे मालिका आणखीनच रंजक होत चालली आहे. अक्षरा व अधिपतीच्या सुखी संसारात विघ्न आणण्यासाठी भुवनेश्वरी कायम नवनवीन डाव रचत असते. या दोघांनाही घराबाहेर काढून भुवनेश्वरीने त्यांची परीक्षादेखील घेतली. नुकतेच मालिकेत एक नवीन वळण आले ते म्हणजे चारुहासने भुवनेश्वरीला घराबाहेर काढलं. (Tula Shikvin Changlach Dhada New Promo)
अधिपती-अक्षरा थायलंडमध्ये हनिमून एन्जॉय करत असताना चारुहासने भुवनेश्वरीला घराबाहेर काढलं. मालिकेत सध्या आता त्यांच्या हनिमूनचे कथानक पाहायला मिळत आहे. या कथानकाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. अशातच या मालिकेत लवकरच एक नवीन ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे अधिपती-अक्षरा परदेशातून पुन्हा परतले आहेत आणि चारुहासने भुवनेश्वरीलं घराबाहेर काढल्याचे अधिपतीला कळलं आहे. झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या नवीन ट्विस्टचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये अधिपती-अक्षरा घरी येताच अधिपतीलं भुवनेश्वरीला शोधत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : चक्क भांडी घासायचा कोकण हार्टेड गर्लला ट्रॉमा, ढसाढसा रडलीही अन्…; कसा निभाव लागणार?
“आईसाहेब घरात दिसत का नाहीत?” हे विचारतो. यावर त्याला चारुहासने आपल्या आईला घराबाहेर काढलं असल्याचं कळतं. त्यामुळे आईला घराबाहेर काढल्याचा राग येऊन अधिपती वडिलांच्या अंगावर धावून जातो. अधिपती चारुहासचा गळा पकडत “तुमची हिंमत कशी झाली?” असा थेट प्रश्न विचारतो. मात्र या दोघांमध्ये अक्षरा येते आणि अधिपतीला अडवते. त्यामुळे आता अधिपतीमुळे भुवनेश्वरी पुन्हा घरी परतणार का?, बाप-लेकाच्या नात्यात आणखी दुरावा येणार का? की अक्षरा या दोघांचे नाते पुन्हा एकदा सुधारण्यास मदत करणार? हे आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनेच फसवलं, दुसऱ्याच मुलीबरोबर पकडलं अन्…; म्हणाली, “माझ्या आयुष्यामध्ये…”
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा असतो. तर, अक्षरा ही एका शाळेत शिक्षिका असते. त्यामुळे अधिपती तिला प्रेमाने ‘मास्तरीण बाई’ अशी हाक मारत असतो. त्याचं अक्षरावर मनापासून प्रेम असतं. सुरुवातीला या दोघांचं मनाविरुद्ध लग्न होतं. पण, आता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भागात अक्षराने अधिपतीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली.