Itsmajja Original Paus Series : ‘मीडिया वन सोल्युशन्स’ व ‘इट्स मज्जा’ हे कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आहे आणि त्यामुळेच ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायमच नवनवीन कंटेट घेऊन येत असतात. मनोरंजन क्षेत्रातील विविधता ‘इट्स मज्जा’ने कायमच जपली आहे. याच विविधतेमुळे ‘इट्स मज्जा’ने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘इट्स मज्जा’च्या आठवी अ या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधीसोपी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या ‘आठवी-अ’ सीरिजद्वारे सांगण्यात आली आणि या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या सीरिजने गेले अनेक दिवस प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. (Itsmajja series paus first poster)
‘आठवी-अ’ ही सीरिज प्रचंड गाजत होती. मात्र, प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. अशातच या सीरिजने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर होता. पण ‘आठवी-अ’ ही सीरिज संपली असली तरी ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायमच तत्पर असणार आहे. प्रेक्षकांच्या याच मनोरंजनाची हमी घेत ‘इट्स मज्जा’ लवकरच ‘पाऊस’ ही नवीन सीरिज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे आणि ही नवीन सीरिज म्हणजे ‘पाऊस’. ‘पाऊस’ हा कायमच प्रत्येकासाठी स्पेशल असतो. पावसाबरोबरच्या अनेकांच्या आठवणी या अविस्मरणीय असतात आणि या आठवणी बेभान करणार्या असतात. त्यामुळे ‘इट्स मज्जा’च्या ‘पाऊस’ या सीरिजद्वारे प्रेक्षकांना बेभान करायला येत आहे.
नुकताच ‘पाऊस’ या नवीन सीरिजचा मुहूर्त पार पडला. त्यानंतर या सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. अशातच ‘पाऊस’ सीरिजचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या नवीन पोस्टरमध्ये तरुण-तरुणी हातात छत्री घेऊन डोंगराच्या कड्यावर उभे असलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता पाऊस, एक जोडपे आणि या दोघांच्या मागे एक दिसणारे हिरवेगार अरण्य याचे काय साधर्म्य आहे? या सीरिजची नेमकी कथा काय आहे? यात कोणते कलाकार आहेत? याची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे.
आणखी वाचा – प्रतिमाला खुश ठेवायला सुभेदार कुटुंबाची धावपळ, तर तन्वी-अर्जुनमधील जवळीकता सायलीला खटकणार?, मालिकेत मोठं वळण
दरम्यान, या नवीन सीरिजची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांचेच असून या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी स्वीकारली आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह हेड अंकिता लोखंडे आहेत. ही सीरिज तुम्हाला ‘इट्स मज्जा’ या युट्यूब वाहिनीवर पाहता येणार आहे.