‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाचे बिगुल वाजले असून यंदाच्या नवीन पर्वाची सुरुवात अगदी धमाकेदार झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये दमदार स्पर्धकांचा सहभाग आहे. यंदाच्या सीझनचं होस्टिंग रितेश देशमुख करत आहे. रितेश देशमुखने ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वात स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात नेते, अभिनेते, कीर्तनकार व सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अशा एकूण सोळा स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. घरातील सहभागी स्पर्धकांवर चाहत्यांसह कलाकार मंडळीदेखील व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वावर टिप्पणी करणाऱ्या कलाकारांपैकी उत्कर्ष शिंदे हा एक आहे. ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या भागापासून त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अशातच त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे जी चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांचा फोटो पाहायला मिळत आहे.

वर्षाताई व निक्की तांबोळी यांच्या फोटोसह उत्कर्ष शिंदेने “आलिया भोगासी असावे सादर” असं म्हटलं आहे. उत्कर्ष शिंदेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या पोस्टद्वारे त्याने नक्की कुणावर निशाणा साधला आहे कळू शकत नाही. ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण हे पहिल्याच दिवसापासून वादाचे बनले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून निक्की व वर्षा यांच्यात भांडणं होत आहेत.
आणखी वाचा – Video : परदेशात भारतीय संस्कृती व परंपरांचे दर्शन, आदेश बांदेकर भारावले, व्हिडीओ व्हायरल
वर्षा व निक्की यांच्यातील भांडणात निक्की वारंवार वर्षाताईंना टार्गेट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षा-निक्की यांच्या भांडणात निक्की वर्षाताईंना वरचढ ठरत आहे. त्यामुळे आता उत्कर्ष शिंदेने त्याच्या या पोस्टद्वारे नक्की कुणावर निशाणा साधला आहे हे कळू शकत नाही.