‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाचा श्रीगणेशा हा भांडणांनी झाला असून पहिल्या दिवसापासून या घरात कोणत्या ना कोणत्या कारणांनी भांडणं होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता ‘बिग बॉस’मध्ये नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ आणि टास्क हे एक समीकरणच आहे. स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावेच लागतात. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे आणि या नॉमिनेशन टास्कचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी ‘बिग बॉस’ने ‘नॉमिनेशन तोफ’ या कार्याचा अवलंब केला आहे. यात ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर व निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.
या नवीन प्रोमोमध्ये निखिल प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी ‘बिग बॉस’ देत आहेत नॉमिनेशनची तोफ असं म्हणतो. यामुळे पुढे निक्की व अंकिता यांच्यात भांडण सुरु होते आणि यावेळी निक्की तिला “तुझं तोंड मी खलबत्त्याने ठेचलं नाही तर बघ” असं म्हणते. पुढे अंकिताही निक्कीला तिच्या नाकावरुन चिडवून दाखवते. तसंच “धक्का नको देऊ” असं म्हणत ती निक्कीला ढकलते. यावर निक्कीही तिला ढकलत “तू मला हात लावू नकोस” असं म्हणते. हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून यातून आजचच्या भागात निक्की व अंकिताचे जोरदार भांडण होणार असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा – मेष व मीन राशींच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस फायद्याचा, नोकरी-व्यवसायात मिळणार अपेक्षित यश, जाणून घ्या…
‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाच्या प्रीमियरपासूनच ‘बिग बॉस’ स्पर्धकांना पेचात पाडत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसंच घरातील सदस्यांचे भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती ‘बिग बॉस’ प्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत. ‘बिग बॉस मराठी’ सुरु होऊन अजून चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या नॉमिनेशन टास्कसाठी भिडताना अंकिता व निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील झालेली पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे निक्की-अंकिता यांच्या या राड्यादरम्यान नॉमिनेशन टास्क कसा पूर्ण होणार? हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सुरक्षित होणार? आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.