पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे हरीशच्या मागे आदित्य जात असतो मात्र आदित्यला पाहून हरीश पुढे पुढे धावत असतो तर त्या मागून आदित्य धावत असतो. त्याच वेळेला हरीश एका रिक्षात बसतो आणि निघून जातो. आदित्य धावत धावत येऊन थांबतो तेव्हा मागून एक भरधाव वेगाने ट्रक येतो आणि तो आदित्यला उडवतो. आदित्यचा खूप मोठा अपघात होतो. तर इकडे अहिल्यादेवी देवाजवळचा दिवा तेवत राहावा म्हणून प्रयत्न करत असतात. मात्र सुसाट्याचा वारा सुटतो आणि देवा जवळचे सर्व दिवे विजले जातात हे पाहून अहिल्यादेवींना आणखीनच काळजी वाटू लागते. (Paaru Serial Update)
अहिल्यादेवी खाली येतात आणि सांगतात की, श्रीकांत एकदा आदित्यला फोन कर मला आता या क्षणी त्याची खूप काळजी वाटते. श्रीकांत आदित्यला फोन लावतात मात्र त्याचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असतो. काही वेळाने श्रीकांतला एक फोन येतो तो फोन अहिल्यादेवींना वाटतो की आदित्यचा आहे म्हणून त्या फोन उचलतात आणि समोरुन सिटी हॉस्पिटल मधून डॉक्टर बोलत असतात ते सांगतात की, आदित्य किर्लोस्कर यांचा खूप मोठा अपघात झाला आहे तुम्ही ताबडतोब सिटी हॉस्पिटलला निघून या हे ऐकून अहिल्यादेवी पूर्णता कोलमडतात. त्याक्षणी कसलाही विचार न करता त्या हॉस्पिटलला जायला निघतात तर इकडे प्रीतमने प्रेझेंटेशन देत क्लाइंटची मन जिंकलेली असतात आणि क्लाइंटही प्रीतमच भरभरुन कौतुक करतात. तर इकडे पारू मंदिरात गेलेली असते तर तीही तिच्या गळ्यातील मंगळसूत्र कायमचं काढून ठेवते.
पारू जेव्हा घरी येते तेव्हा ती आदित्यच्या खोलीत जाते त्यावेळेला सावित्री धावत धावत येते आणि पारुला सांगते की, आदित्य सरांचा खूप मोठा अपघात झाला आहे, हे ऐकून पारू जमिनीवरच बसते. तेव्हा सावित्रीला आठवतं की, पारुने गळ्यातील मंगळसूत्र काढलं त्यामुळे हे आदित्य सरांच्या जीवावर बेतलं आहे मात्र त्या क्षणी ती काहीच विचार न करता दोघीही हॉस्पिटलला जायला निघतात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगतात की, आदित्यची तब्येत थोडी खालावली आहे त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल केलं आहे. अहिल्यादेवी आदित्यजवळ जातात आणि सांगतात की, तू आदित्य किलोस्कर आहे त्यामुळे तुला या आजारपणातून बरं व्हावं लागेल तुला असं बेडवर झोपलेलं मला पाहवत नाहीये. लवकर बरा हो आपण आपल्या घरी जाऊ. तर डॉक्टर सांगतात की, आदित्यच्या डोक्याला जखम झाली आहे आणि भरपूर रक्तस्राव झाला आहे. त्यामुळे थोडं काळजी करण्यासारखं वातावरण आहे हे ऐकल्यावर अहिल्यादेवी डॉक्टरांना सांगतात की, तुम्ही काही काळजी करु नका तुम्ही योग्य ते उपचार द्या. आदित्य किर्लोस्कर आहे तो.
अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा मुलगा आहे तो त्यामुळे तो या आजारपणातून नक्की परतणार असा धीर त्या इतरांना देतात हे पाहून श्रीकांतला तिचं कौतुक वाटतं. तर दिशा व दामिनी आदित्य जगणार की मारणार यावर चर्चा करत असतात. त्यानंतर इकडे पारू व सावित्री आदित्यला बघायला हॉस्पिटलला आलेल्या असतात. रिसेप्शनला विचारतात तितक्यातच त्यांना दिशा व दामिनी दिसतात. तेव्हा दिशा व दामिनी सांगतात की, कुटुंबांसाठी इथे येणं फक्त योग्य आहे तुम्ही आमच्या मेड आहात त्यामुळे तुम्ही इथे येणं अयोग्य आहे.त्यावेळेला दिशा पारुला सांगते की, तो हरीश तुला सोडून गेला. तुझं आयुष्य मार्गी लागाव म्हणून आदित्य त्या रस्त्यावरून एकटा फिरत होता त्यावेळेला त्याचा अपघात झाला यालाही तूच कारणीभूत आहे, हे ऐकून पारु आणखीनच कोलमडते. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, पारू देवाजवळ प्रार्थना करते की माझं संपूर्ण आयुष्य तू घे असंही माझं आयुष्य काहीच कामाचं नाहीये पण आदित्य सरांना लवकर बर कर. आता कोणता दैवी चमत्कार होणार का हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.