अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी चर्चेत असते. २०१२ साली ती अभिनेता सैफ अली खानबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघांचा धर्म वेगळा असल्याने त्यांचे लग्न हे चांगलेच चर्चेत राहिले. अनेकांनी या लग्नाला लव्ह जिहाददेखील म्हंटल. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपला सुखी संसार सुरुच ठेवला. त्यांना तैमुर व जेह अशी दोन मुलंदेखील आहेत. अनेकदा मुलांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. तैमुर जेव्हा पहिल्यांदा माध्यमासमोर आला तेव्हा त्यांच्या फोटोंचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात होते. तसेच जेहच्या फोटो व व्हिडीओलादेखील अधिक पसंती मिळते. (nanny on saif ali khan and kareena kapoor)
सैफ व करीना जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची मुलंदेखील असतात. मुलांना सांभाळण्यासाठी नॅनीची नियुक्ती केली जाते.ती त्यांची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्याबरोबर दिवसभरासाठी असते. तैमुर व जेह यांना सांभाळणारी नॅनी या अधिक चर्चेत दिसतात. त्यांचे नाव ललिता डिसिल्वा असून त्या अनेक वर्षांपासून अनेक सेलिब्रिटींच्या मुलांना सांभाळण्याचे काम करतात. नुकतीच त्यांनी दिलेली एक मुलाखत चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी अनेक खुलासे यामध्ये केले आहेत.
नुकताच ललिता यांनी ‘पिंकविला’च्या ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी करीनाच्या घराशी संबंधित अनेक बाबींचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, “मी गेल्या आठ वर्षांपासून जेह व तैमुरचा सांभाळ करत आहे. करीना व सैफ दोघंही खूप सामान्य माणसं आहेत. ते सकाळी स्टाफबरोबरच नाश्ता करतात. स्टाफसाठी वेगळं आणि त्यांच्यासाठी वेगळं असं काहीही जेवण बनत नाही. सगळ्यांसाठी एकाच दर्जाचे जेवण बनते. अनेकदा तर आम्ही एकत्र जेवायला बसतो”. पुढे त्यांनी सांगितले की, “सैफ खूप छान जेवण बनवतो. जेव्हा ते पटौदी पॅलेसमध्ये जातात तेव्हा ते स्वतः जेवण बनवतात. मी मांसाहार करत नाही पण सैफ मटण खूप छान बनवतो. तसेच तो इटालियन जेवणही खूप छान बनवतो”.
यानंतर त्यांना त्यांच्या कमाईबद्दल विचारले की. “तुम्हाला अडीच लाख रुपये मिळतात का?, त्यावर त्यांनी हसून उत्तर दिले की, “अडीच लाख रुपये ?, तुम्ही बोलताय ते खर होऊदे. पण या सगळ्या अफवा आहेत. मी करीनाबरोबर याबद्दलची चर्चादेखील केली तेव्हा तिनेही या सगळ्याकडे लक्ष देऊ नकोस असे सांगितले”. ललिता यांची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.