‘सर’ या चित्रपटामधून अभिनेत्री तिलोत्तमा शोम ही अधिक प्रकाशझोतात आली. यामधील तिलोत्तमाच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. याचप्रमाणे ती अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्येही काम करताना दिसून आली होती. सध्या ‘त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर’ ही वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर आली असून याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली दिसून येत आहे. यादरम्यान तिची एक मुलाखत अधिक चर्चेत राहिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग शेअर केले आहेत. हे प्रसंग ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (tillotama shome incidence)
तिलोत्तमाने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगाबद्दल सांगितले आहे. तसेच या मुलाखतीमध्ये लैंगिक शिक्षणावरही भाष्य केले आहे. ‘हॉटर फ्लाय मेल फेमिनिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्याबद्दल अनेक खुलसे केले आहेत. तसेच आई-वडिलांना अनेक प्रश्नदेखील विचारण्याची सवय होती असेही तिने सांगितले आहे. ती आई-वडिलांना मुलं कशी जन्माला येतात?, सेक्स कसा केला जातो? असे प्रश्न विचारत असत तसेच तिचे पालकही सर्व उत्तर देत असत.
आणखी वाचा -कंगना रणौतची Paris Olympics वर सडकून टीका, फोटोही केला शेअर, म्हणाली, “धर्माची मस्करी…”
पुढे तिने सांगितले की, “जेव्हा मी दिल्लीमध्ये होते त्यावेळी थंडीचे दिवस सुरु होते. मी बस स्टँडवर उभी होते . तेव्हा तिथे गाडी आली, थांबली आणि त्यातून सहा लोक बाहेर पडले. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मी तिथून बाजूला झाले”.
त्यानंतर ती म्हणाली की, “रस्त्याच्या मधोमध आले आणि लिफ्ट मागू लागले. त्याचवेळी माझ्यासमोर एक मेडिकल साईन असलेली एक गाडी येऊन थांबली. तेव्हा वाटलं की ती गाडी सुरक्षित असेल म्हणून मी पुढील सीटवर बसले. त्यानंतर तिथे बाजूला बसलेल्या व्यक्तीने पॅंटची चैन उघडली आणि माझा हात पकडला. यापासून बचाव करण्यासाठी मी हात झटकला आणि स्वतःला मागे खेचले. त्यानंतर गाडी थांबवून त्या व्यक्तीने मला उतरण्यास सांगितले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर मी खूप घाबरले होते”, असंही तिने सांगितलं.