नवरात्र म्हंटली की गरबा समोर येतो. अर्थातच त्यामुळे प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या गाण्यांचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. बॉयकट, नेहमी सूट किंवा शर्ट पॅंटमध्ये असणाऱ्या फाल्गुनीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या गाण्यांना मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत असते. मात्र इतके वय होऊनदेखील फाल्गुनीने अजून लग्न का केले नाही? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. त्यावर स्वतः फाल्गुनी यांनी खुलासा केला आहे. गायिका नुकतीच अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या एका चॅट शोमध्ये पोहोचली होती. यावेळी त्यांच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. (falguni pathak on marriage)
करिश्माच्या शोमध्ये आल्यानंतर त्यांच्या फाल्गुनीबरोबर अनेक गप्पा झाल्या. यावेळी त्यांना लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “माझ्यासाठी संगीतच सगळं आहे. आतापर्यंत संगीताव्यतिरिक्त मी कशाचाही विचार केला नाही. मी संगीताबरोबर अधिक जोडले गेले आहे. मी लहानपणापासून संगीताशी जोडले गेले आहे आणि यापुढेही असेन. माझी काळजी घेण्यासाठी माझे आई-वडील आहेत तसेच मी स्वतःही आहे”. तसेच तिला बॉयकट लूकबद्दलही विचारण्यात आले. त्यावर तिने उत्तर दिले की, “आई-वडिलांना चार मुली झाल्या पण मुलगा नाही झाला. त्यामुळे लहानपणापासूनच मी मुलांप्रमाणे राहू लागले”.
आणखी वाचा – मोठी बातमी! ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, कारणही आलं समोर
फाल्गुनीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती गायिका असण्या बरोबरच ती एक कलाकार व संगीतकारदेखील आहे. १९८७ साली त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला गाण्याचा अल्बम १९९८ साली समोर आला होता. तसेच ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘कौन बनेगा करोंडपती’ व ‘कॉमेडी नाईट्स’ अशा अनेक कार्यक्रमांमध्येही दिसून आली होती.
तसेच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, वयाच्या नवव्या वर्षी तिने पहिला परफॉर्मन्स दिला. याबद्दल जेव्हा तिच्या घरी माहीत पडलं तेव्हा त्यांच्या वडिलांनी मारलंही होतं. फाल्गुनी यांनी भवदीप जयपूरवाले यांच्याकडे संगीताचे पाच वर्ष प्रशिक्षण घेतले. मिळालेल्या माहितीनुसार फाल्गुनी एका शोचे त्या २० ते २५ लाख रुपये मानधन घेतात.