छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. वेगळा विषय, वेगळा आशय तसेच हटके कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीच उतरली आहे. नेत्रा, विरोचक, त्रिनयनादेवी, रुपाली, अस्तिका या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. कलाकारांच्या अभिनयामुळे व कथेमुळे मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. मालिकेत एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षक मालिकेत खूपच गुंतले आहेत.
मालिकेत सध्या नेत्राचे गरोदर दाखवण्यात आले असून तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विरोचकाचाच एक अंश आहे. आधी तिला याबाबत माहिती नसते. मात्र नुकत्याच झालेल्या भागातून तिच्या पोटातील बाळ हे विरोचकाचे अंश असल्याचा उलगडा झाला आहे. यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. मात्र नेत्रा व इंद्राणी त्रिनयना देवीवर विश्वास ठेवत तिच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे या परिस्थितीत खचून जात नाहीत. पण आता मालिकेत येणाऱ्या एका नवीन वळणामुळे प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय होणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.
झी मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे या मालिकेचा एक नावीम प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामुळे राजाध्यक्ष विरुद्ध नेत्रा असा संघर्ष होताना दिसणार आहे. मालिकेच्या या नवीन प्रोमोमधून नेत्राच्या पोटात विरोचकाचा अंश असल्याने राजाध्यक्ष कुटुंबीय तिला गर्भपात करायला सांगत आहेत. मात्र नेत्राचा हा आईपणाचा पहिलाच अनुभव असल्याने ती हे असं करण्यास विरोध करत आहे. एकीकडे रुपाली नेत्राला तिच्या पोटात विरोचकाचा अंश असल्यावरून तिला सतत डिवचत आहे. नेत्राला वाईट वाटेल, दुःख होईल असं वागत आहे. तर दुसरीकडे इंद्राणी, अद्वैत सह राजाध्यक्ष कुटुंबीय नेत्राला तिचे बाळ नष्ट करण्यासाठी सांगत आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ शो स्क्रिप्टेड असतो का? स्पष्टचं बोलला रितेश देशमुख, म्हणाला, “या शोची…”
या सगळ्यामुळे द्विधा मनस्थितीत अडकलेली नेत्रा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. पण असं असूनही ती तिच्या पोटातील बाळ पाडण्यास नकार देत “मातृत्वाची भावना काय असते, हे तुम्हाला कळणार नाही” असं नेत्राला म्हणत आहे. त्यामुळे त्रिनयना देवीच आता एकमेकांच्या विरुद्ध उभ्या राहिल्या आहेत. रुपालीविरुद्ध लढण्याऱ्या नेत्रा-इंद्राणी आता स्वतःच एकमेकींच्या विरुद्ध उभ्या राहिल्याने मालिकेत काय नवीन वळण येणार? नेत्रा तिच्या बाळाची सोडवणूक कशी करणार? देवीआई नेत्राच्या मदतीला धावून येणार का? की या सगळ्यात विरोचक त्याचा डाव साधणार हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.