Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील सर्वांचा आवडता, लोकप्रिय पण तरीही तितकाच वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे बिगुल वाजले असून सर्वांना या शोबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात प्रेक्षकांना काही खास गोष्टी पाहायला मिळतील. धमाल, मस्ती, गॉसिपसह अनेक गोष्टी या नवीन पर्वात अनुभवायला मिळणार आहेत. परंतु, यंदा शोमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंतचे ‘बिग बॉस मराठी’च्या चार पर्वांचं होस्टिंग दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र, आता ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे.
‘बिग बॉस’ या शोबद्दल अनेक रहस्य व गुपिते कायमच असतात. या शोबद्दलची अनेक प्रश्ने निरुत्तर असतात. असाच ‘बिग बॉस’ या शोबद्दल कायमच एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड असतो का? ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वाला हा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात असतो. अशातच ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाचा होस्ट रितेश देशमुखने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड असतो का? याबद्दल रितेशने खुलासा केला आहे.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर असं जीवन जगत आहे हार्दिक पांड्याची पूर्वश्रमीची पत्नी, कसा भागवते खर्च?
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अभिनेता रितेश देशमुखने शोबद्दल भाष्य केले. यावेळी त्याला ‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड असतो यावर रितेशचं मत विचारण्यात आलं. यावर रितेशने असं म्हटलं की, “अजून माझ्याकडे या शोची स्क्रिप्ट आली नाही. म्हणून सध्या अन-स्क्रिप्टेडचं चालू आहे”. तसेच यावेळी त्याने मी या शोचा चाहता असल्याने होस्टिंगच्या ऑफरला लगेचच होकार दिला. ‘बिग बॉस’मध्ये येणे हा माझा सन्मान असल्याचेही त्याने म्हटले.
आणखी वाचा – Video : थायलंडमध्ये अक्षरा-अधिपतीचा हनिमून, समुद्रकिनारी जोडप्याचा रोमान्स, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भारावले
दरम्यान, येत्या २८ जुलैपासून ‘बिग बॉस’ मराठीचे पाचवे पर्व बघायला मिळणार आहे. रोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर ‘बिग बॉस’ हा शो बघता येणार आहे. रितेश देशमुखला ‘बिग बॉस’ मराठी ५ मध्ये आपली छाप सोडता येणार का? तो या शोमध्ये काय नावीन्य आणणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस या शोचे व रितेश देशमुखचे अनेक चाहतेही चांगलेच उत्सुक आहेत हे नक्की…