लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस ओटीटी ३’ ची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. हा शो सुरु झाल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्विस्टही आले. या कार्यक्रमात सहभागी असलेली वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित व युट्यूबर अरमान मालिकची पहिली बायको पायल मलिक या दोघीही बाहेर पडल्या. घराबाहेर पडल्यानंतरही व्लॉग व मुलाखतीच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या सतत संपर्कात असतात. त्यांची वक्तव्यदेखील अधिक चर्चेत असलेली पाहायाला मिळाली आहेत. अशातच आता दोघींनीही ‘बिग बॉस ओटीटी ३’ वर भाष्य केले आहे. (payal malik and chandrika dixit on big boss ott makers)
‘बिग बॉस ओटीटी ३’ च्या फायनलसाठी आता दोन आठवडे बाकी आहेत. गेल्या आठवड्यात दीपक चौरसिया एलिमिनेट झाला होता. त्यानंतर आता सना सुलतान व अदनान शेखलाही बाहेर करण्यात आले. पायल व चंद्रिका बाहेर पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. आता त्या दोघींनी ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या निर्मात्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. चंद्रिका व पायल यांची पायलच्या घरी भेट झाली. पायलने शेअर कलेल्या व्लॉगमधून हे पाहायला मिळाले होते. यावेळी दोघींनी सना मकबुलबाबत बोलताना दिसते.
आणखी वाचा – “घटस्फोटामुळे मी खूप आनंदी”, किरण रावचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “आमिरबरोबरचं नातं…”
यावेळी पायलने चंद्रिकाला सांगितले की, “मी अरमान व कृतिकाचे सगळे कपडे पाठवले होते. पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहेत”. त्यानंतर तिने चंद्रिकाला विचारले की, “ मला एक सांगा इतर सदस्यांचे फोटो पोहोचत नाहीत आहेत पण सना मकबुलचे कपडे वेळेत पोहोचत आहेत. असे का?” त्यानंतर चंद्रिका उत्तर देताना म्हणाली की, “तिला स्पेशल ट्रीटमेंट मिळत आहे. पण सगळ्यांना सारखीच वागणूक द्या. माझे कपडेदेखील मला मिळत नव्हते. कृतिका,अरमान व पायलच्या बाबतीतही तसेच झाले. मात्र एका व्यक्तीलाच भरपूर कपडे मिळत होते. अरमानचे कपडेदेखील बाहेरच ठेवले असतील. त्याला राग यावा म्हणून असं असतील किंवा एखादा माणूस मागून मागून घरात भांडण करेल यासाठी ते असं करत असावेत”.
चंद्रिका व पायलच्या या संभाषणानंतर आता ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये कोणत्या प्रतिक्रिया उमटतील हे आता पाहण्यासारखे आहे. तसेच आता विजेता कोण होणार? याबद्दलही सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.