सध्या ‘बिग बॉस ओटीटी ३’ची जोरदार चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात. युट्यूबर अरमान मलिक हा अधिक चर्चेत येऊ लागला आहे. यामध्ये अरमानच्या दोन बायका म्हणजे पायल मलिक व कृतिका मलिक यादेखील सहभागी झाल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे पायल काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस…’मधून बाहेर पडली. मागील आठवड्यात अरमानने सदस्य विशाल पांडेला कानशीलात लगावल्याने अरमानला घराबाहेर काढण्याची विनंतीदेखील विशालच्या आईवडिलांनी केली होती. मात्र आता त्याची पहिली पत्नी पायलने अरमानबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. (payal malik on arman malik)
‘बिग बॉस…’च्या घरातून बाहेर आल्यानंतर पायल ही व्लॉगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहू लागली. तिने आपल्या अनेक भावना सोशल मीडियातून व्यक्त केल्या आहेत. तिने व्लॉगमध्ये ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचेही अनेकदा सांगितले आहे. यामुळे तिला आता या सगळ्यांचा त्रास होत असल्याचेही सांगितले.
पायलने नुकताच एक व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये तिला अरमानपासून वेगळे होणार असल्याचे सांगितले, ती म्हणाली की, “मी आता या सगळ्यामुळे खूप त्रस्त झाले आहे. जोपर्यंत हे सगळं माझ्याबाबतीत होतं तोपर्यंत ठीक होतं. पण आता याचा परिणाम माझ्या मुलांवरही होऊ लागला. हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे आता मी अरमानला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुलांचा सांभाळ करेन. अरमान कृतिकाबरोबर राहील”.
पुढे ती म्हणाली की, “मला माहीत आहे की कृतिका जैदशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे ती त्याच्याबरोबर राहील. मी माझ्या तीन मुलांबरोबर वेगळं राहीन. आम्ही तिघं वेगळे राहू. हे आम्ही सगळं ऐकू शकतो पण मुलांसाठी हे तितकं सोपं नाही. आम्ही अशा ठिकाणी शिफ्ट होऊ जिथे आम्हाला कोणीही ओळखत नसेल. लोकं आमच्याबद्दल इतकं काही बोलत आहेत की मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. जे आम्हाला चांगलं समजत होते तेदेखील आमच्याबद्दल खूप वाईट बोलत आहेत”.त्यामुळे आता ‘बिग बॉस…’ मधून बाहेर पडल्यानंतर खरच अरमान व पायलचा घटस्फोट होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.