“पुढचं पाऊल” या मालिकेतून जुई गडकरी नावारूपाला आली. या मालिकेतील तीच कल्याणी हे पात्र सालस आणि एका गुणी सुनेचं दाखवलं होतं. या पात्राला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम सुद्धा मिळालं होतं. आता जुई “ठरलं तर मग” या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. याचबरोबर जुई सोशल मीडियावर तिचे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करतच असते. जुईने नुकताच तिच्या फोटोंचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. (Jui Gadkari New Look)

हे देखील वाचा: “थँक यु फॉर गिव्हिंग बर्थ टु रेणुका” आणि निर्मात्याने मानले आईचे आभार
या व्हिडीओमध्ये जुईने साडी नेसली असून जुईने अगदी साधा लुक केला आहे. हा व्हिडीओ तिने ब्लॅक अँड वाईट कलर मध्ये पोस्ट केला आहे. जुईच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी “स्माईलनच घायाळ करून टाकल किं ग तु” तसेच “साडी आणि तु”, दोन्हीं कमाल,” अशा छान कमेंटस देखील केल्या आहेत. (Jui Gadkari New Look)

जुईने वयक्तिक आयुष्यात आजारपणामुळे बऱ्याच खस्ता खाल्या आहेत. जुई एका मोठ्या आजारातून बाहेर पडली असून, त्या साठी ती अजून सुद्धा बरेच प्रयत्न करत आहे. जुईने नियमित योग आसन केलं. जुईच या आजारपणामुळे नियमित डोकं दुखायचं. जुईने या आजारपणातून स्वतः चं स्वतःला सावरलं.

हे देखील वाचा: क्रांतीच्या मुलीचं बाबांशी घट्ट नातं, पहा क्रांतीच्या मुलींची झलक
या व्यतिरिक्त जुईने बिग बॉस सीजन एक मध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमातून जुईची दुसरी बाजू प्रेक्षकांना समजली. जुईने या कार्यक्रमात जिथे तिला काही गोष्टी पटल्या नाहीत, तर त्यावर तिने तिची परखड मत सुद्धा मांडली. या कार्यक्रमात तिच्या सोबत तिची गाजलेली मालिका “पुढचं पाऊल” यामधील सहकलाकार आस्ताद काळे देखील होता. (Jui Gadkari New Look)
