शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गुरुपौर्णिमानिमित्त प्रेक्षकांसाठी खास भेट, ‘श्री स्वामी समर्थ’ गाणं सर्वत्र प्रदर्शित

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 20, 2024 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Media One Solutions and its majja original Presented Shri Swami Samarth song released know more.

गुरुपौर्णिमानिमित्त प्रेक्षकांसाठी खास भेट, 'श्री स्वामी समर्थ' गाणं सर्वत्र प्रदर्शित

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!” या शब्दांमध्ये श्री स्वामी समर्थांनी अनेक भक्तगणांना अभयदान दिलं आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्रीदत्तात्रयांचे अवतार मानले जातात. असंख्य लोकं आज स्वामींची आराधना अन् उपासना करतात. स्वामींच्या अनेक भक्तांना कायम वाटतं की, आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपार्शिवाद आहे. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी स्वामींचा ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा दिलासा कायम आधार देतो. त्यामुळे स्वत: स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा विश्वास आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. ‘अशक्यही शक्य करतील स्वामी’ अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. 

अनेकांच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ हे गुरुंची भूमिकाही निभावतात. हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. लोक गुरूला देवासारखे पूजनीय मानतात. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. याच निमित्ताने महाराष्ट्रात अक्कलकोटमध्येही गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी केली जाते. स्वामींचे अनेक भक्त त्यांना गुरु म्हणून पूजतात.

आणखी वाचा – Video : गावी भातलावणी, भजन अन् खेकडे पकडण्यात रमला निखिल बने, व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक, साधेपणाचं कौतुक

अशातच उद्या २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. याच गुरुपौर्णिमेचे खास औचित्य साधत ‘इट्स मज्जा’ समस्त स्वामी भक्तांसाठी एक खुशखबर घेऊन आली आहे. २१ जुलैच्या गुरुपौर्णिमानिमित्त ‘इट्स मज्जा’ सर्व स्वामी भक्तांच्या भेटीला स्वामींचं एक खास भक्तीगीत घेऊन येत आहे. ‘श्री स्वामी समर्थ’ असं या गाण्याचं शीर्षक असून “ब्रम्हांड नायक अवधूत चिंतन, त्रैलोक्या आधार स्वामीच आहे” या ओळींनी गाण्याची सुरुवात होते. गाण्यामधील भक्तीभावामुळे गाण्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे गाणं श्रोत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – आता विषय हार्ड व्हनार! ‘तुला शिकवीन…’ फेम अधिपती-अक्षरा परदेशात करत आहेत एन्जॉय, व्हिडीओ चर्चेत

मनाचा ठाव घेणाऱ्या या गाण्याचे शब्दांकन श्रीकांत पेंढारकर यांनी केले आहे, तर गायन समीर दाते यांनी केलं आहे. तर या सुंदर भक्तीगीताला निषाद वैद्य यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘इट्स मज्जा ओरिजिनल’ आणि शौरिन दत्ता निर्मित ‘श्री स्वामी समर्थ’ हे भक्तीगीत आज दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब वाहिनीवर प्रदर्शित झाले आहे.

Tags: marathi entertainment newsShri Swami SamarthShri Swami Samarth Song News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bollywood actor Arjun Kapoor shared new cryptic post amid breakup rumours with actress malaika arora

मलायकापासूनचा विरह अर्जुनला सहन होईना?, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अभिनेत्याची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला, “गोष्टी कशाही झाल्या तरी…”    

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.