‘बिग बॉस’ हा टीव्हीवरील वादग्रस्त पण तरीही तितकाच लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. हा शो या कंटेटसाठी जितका ओळखला जातो, तितकाच तो घरातील स्पर्धकांसाठीही ओळखला जातो. या घरात अरमान मलिकने त्याच्या दोन पत्नींबरोबर एंट्री केल्यापासून तो चर्चेत आला आहे. अरमानने सह-स्पर्धक विशाल पांडेला रागाच्या भरात थप्पड मारली तेव्हा त्याच्यावर आणखीच टीका होऊ लागली. त्यानंतर तो पत्नीबरोबर ब्लँकेटमध्ये एकत्र दिसल्यामुळेदेखील चर्चेत आला होता. अशातच आता त्याच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. अरमानविरुद्धच्या एफआयआरची एक प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अरमानच्या एफआयआरच्या प्रतिबरोबरच त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अभिमानाने सांगत आहे की, त्याच्यावर गुन्हा दाखल असूनही तो बाहेर फिरत आहे. अरमानवर त्याच्या घरात काम करणाऱ्या ११ वर्षीय मुलीला अंमली पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. यासंबंधित एफआयआरची प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानुसार अरमानला २३ सप्टेंबर २०१९ रोजी अटक करण्यात आली आणि ७ जून २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. अरमानची पत्नी पायल मलिकवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, अल्पवयीन मुलगी अरमानच्या घरी २४ तास राहायची. पायलचा मुलगा चिकूची काळजी घेण्यापासून ते घर साफ करण्यापर्यंतची सर्व कामे ती करत असे. तिने अरमानवर आरोप केला की, जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य अहमदाबादला गेले होते तेव्हा त्याने तिला ड्रग्ज दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. भीतीमुळे तिने याबाबत कोणालाच सांगितले नाही, मात्र नंतर अरमानवर गुन्हा दाखल करण्यात आला.
The way #ArmaanMalik to #AdnaanShaikh said with pride "Laga hai case phir bhi bahar ghum raha hu"!!
— Nisha Rose🌹 (@JustAFierceSoul) July 17, 2024
Shows not only how low #BiggBossOTT3 has stooped for TRP!!
But also the condition of our law system!!
DISGUSTED!!🤢🤮🤢🤮🤢pic.twitter.com/JEaIxXKqTm
आणखी वाचा – मलायका अरोराच्या आयुष्यातून अर्जुन कपूरचा पत्ता कट?, मिस्ट्री मॅनबरोबर परदेशात करतेय एन्जॉय, फोटो व्हायरल
दरम्यान, अरमानचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की, “माझ्यावर केस आहे, तरीही मी बाहेर फिरत आहे” याबाबत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून टीकाही केली आहे. पैसे देऊन त्यांनी व्यवस्थेची खिल्ली उडवली जात असल्याचे आरोप त्यांनी निर्मात्यांवर केले आहेत. तसेच भारतीय कायद्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.