गीता मा हे नाव बॉलिवूडमधील कोणत्या ही व्यक्तीसाठी नवीन नाही. गीता माने तिच्या डान्सिंग स्किल्सने सगळ्यांच्या मनात जागा केली आहे. गीता मा अनेक रिअॅलिटी शोच्या परिक्षकाचे काम करते. छोट्या पडद्यावरील जवळपास प्रत्येक डान्सिंग रिॲलिटी शोमध्ये त्या जजची भूमिका साकारतात. गीताने वयाच्या १५ व्या वर्षापासूनच डान्सच्या करिअरला सुरुवात केली होती. तिने ‘तुझे याद ना मेरी आइ’, ‘गोरी गोरी’ अशा अनेक गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. आपल्या नृत्यकौशल्याने व परीक्षणाने चर्चेत राहणारी गीता मा सध्या तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे.
गीता कपूरने गुपचूप लग्न केल्याची अफवा पसरली आहे. यावर ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गीता कपूरने मौन सोडले आहे. याबद्दल बोलताना तिने असं म्हटलं की, ‘चित्रपट उद्योगाशी संबंधित असलेल्या आपल्या सर्वांना अनेकदा आपल्या संपत्तीबद्दलच्या अनेक अफवांना सामोरे जावे लागते. जसे की माझ्याबद्दल कोणीतरी लिहिले होते की, माझ्याकडे करोडोच्या गाड्या आणि बंगले आहेत. ते वाचून मला आश्चर्य वाटले की, ते सर्व कुठे आहेत. मलाही कळलं पाहिजे, की या करोडो रुपयांच्या गाड्या नक्की कुठे आहेत? मला त्या चालवायच्या आहेत, हे करोडोचे बंगले कुठे आहेत, तिथे मला राहायचं आहे. आमच्याकडे असलेल्या मालमत्तांची माहिती सरकारला आहे आणि आम्ही त्यावर करही भरतो”.
यापुढे ती असं म्हणाली की, “माझ्याबद्दल आणखी एक अफवा पसरली आहे की, मी विवाहित आहे आणि मी गुपचूप लग्न केले आहे. जे की मी केलं नाही. माझे लग्न झाले असते तर मी अभिमानाने सांगितले असते. त्यामुळे मी विवाहित आहे ही अफवा थांबली पाहिजे”. गीता कपूर सध्या सोनी टीव्हीच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ या डान्स रिॲलिटी शोचे परीक्षण करत आहे. गीता व टेरेन्स लुईस २०२० च्या पहिल्या सीझनपासून या शोचे परीक्षण करत आहेत. करिश्मा कपूर या सीझनमध्ये तिसरी परीक्षक म्हणून सामील झाली आहे.
दरम्यान, ५ जुलै १९७३ रोजी मुंबईत जन्मलेल्या गीता कपूर हे नृत्यविश्वातील एक मोठे नाव आहे. आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी कोरिओग्राफ करणाऱ्या गीता कपूरने वयाच्या १५ व्या वर्षी फराह खानची सहाय्यक म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.