सध्या अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम अजूनही सुरु आहे. दोघांचाही विवाह १२ जुलै रोजी मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. जॉन सिना, कर्दाशियन बहिणी, जस्टीन बीबर असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार उपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे बॉलीवूडमधीलही सर्व कलाकार अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले होते. लग्न झाल्यानंतर पुढील दोन दिवसही हा सोहळा सुरु होता. १३ जुलै व १४ जुलै रोजी दोघांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. (sharad kelkar at ambani shubh aashirwad)
राधिका व अनंत यांना आशिर्वाद देण्यासाठी अंबानी कुटुंबीयांनी ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यालाही बॉलीवूड तसेच इतर क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. अनेक कलाकारांचे ग्लॅमरस लूक समोर आले आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमांमधील धमाल-मस्तीचे व्हिडीओदेखील समोर आले. याचबरोबर आता नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे मराठी माणसांची मान उंचावली आहे.
अंबानी कुटुंबाने आयोजित केलेल्या या सोहळ्याचे होस्टिंग हे अभिनेता शरद केळकरने केले होते. या सोहळ्याच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी ही शरद केळकरकडे होती. त्याचे होस्टिंग करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये त्याच्या आवाजाबरोबरच त्याच्या लूकची चर्चादेखील अधिक रंगली. शरदचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “शरदने मराठी लोकांची मान उंचावली आहे”, तसेच दुसऱ्या एकाने लिहिले की, “याचा आवाज एकदम भारी आहे”.
शरदच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने आजवर अनेक हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाबरोबरच आवाजाचीही प्रशंसा अधिक केली जाते. त्याचप्रमाणे शरद हा अनेक चित्रपटांचे डबिंगदेखील करतो. ‘बाहूबली’ चित्रपटातील मुख्य भूमिकेला त्याने त्याचा आवाज दिला होता. यावेळी त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुकही झाले होते.