‘बिग बॉस ओटीटी 3’ सुरु झाल्यापासून अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांचे नाते चर्चेत आहे. कृतिकाला सुंदर म्हटल्यानंतर अरमान मलिकने थेट विशालच्या कानशिलात लगावली. यामुळे सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. या कालावधीत ‘बिग बॉस’ने अरमानला घरातून बाहेर काढले नसले तरी ‘बिग बॉस’मध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जात नाही. या घटनेनंतर अरमान व कृतिका यांच्यात काही काळ दुरावा निर्माण झाला होता. मात्र, नुकताच या कपलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही खूप रोमँटिक झालेले दिसत आहेत.
अरमानची पहिली पत्नी पायल शोमधून बाहेर पडल्यानंतर अरमान आणि कृतिका हे खूपच चर्चेत आले आहेत. १२ जुलै रोजी झालेल्या भागामध्ये या दोघांचे काही खाजगी क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. अरमान मलिक व कृतिका मलिक एका ब्लँकेटमध्ये असताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. ते एकच ब्लँकेट शेअर करत असून ब्लँकेटच्या आत अरमानच्या हाताच्या हालचालीदेखील होतानाचे स्पष्ट दिसत होते. मग तो कृतिकाकडे बघून हसतो आणि तीही परत हसते.
Ye biggBoss ki camera team bi pure mazze de rahi hai bhai 😂#LuvKataria #ElvishYadav #BiggBossOTT3 #KritikaMalik #VishalPandey #SanaMakbul #ShivaniKumari #NaezyTheBaa #SanaSultan #ArmaanMalik pic.twitter.com/1FrxRMMd3V
— 𝕾𝖎𝖉𝔸𝕽𝖆𝖏𝖕𝖚𝖙✨ (@Sid___Rajput) July 13, 2024
आणखी वाचा – Video : नवरदेवापेक्षा रणवीर सिंहच उत्साही, भर लग्नात अभिनेत्याचा भन्नाट डान्स, सगळे बघतच बसले अन्…
गेल्या आठवड्यातील ‘वीकेण्ड का वार’पासून ही जोडी लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी अरमान व कृतिकामध्ये विशालमुळे मोठा वाद झाला होता आणि त्याने कृतिकाला सुंदर म्हटले होते, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र, आता दोघांमधील हा वाद दूर झाला असून त्यांच्या नात्यात सुधारणा होत असल्याचं दिसत आहे. दोघेही एकत्र येत रोमान्सही करताना दिसल्यानंतर पायलचे अनेक चाहते दु:खी झाले आहेत. ते या घरात तिला मिस करत आहेत.
दरम्यान, २०११मध्ये अरमानने पायल मलिकशी लग्न केले आणि त्याला चिरायू (चिकू) मलिक नावाचा मुलगा झाला. २०१८मध्ये अरमानने पायलची मैत्रीण कृतिका मलिकशी लग्न केले. ‘बिग बॉस OTT 3’ च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अरमान मलिक, पायल मलिक आणि कृतिका मलिक यांनी मंचावर होस्ट अनिल कपूर यांची भेट घेतली होती आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले होते.