भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्याही प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा सुरु होती. आजवर अंबानी कुटुंबाने दोन वेळा प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन केले होते. दोन्ही वेळेस या सोहळ्यासाठी जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. आता या दोघांच्याही लग्नाची वेळ येऊन ठेपली आहे. अनंत व राधिकाच्या शाही विवाहसोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. मनोरंजन, औद्योगिक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले आहेत. (pm narendra modi at anant and radhika wedding)
अनंत व राधिका यांच्या शाही विवाह सोहळ्यातील विधीना सुरुवात झाली आहे. दोघांच्याही लग्नाचे वेळापत्रक समोर आले असून कोणते विधी कधी पार पडणार आहेत याबद्दलची माहिती समोर आली आहे. १२ जुलै रोजी म्हणजे आजपासून दुपारी ३ वाजता या विधींना सुरुवात झाली आहे. रात्री ९.३० वाजता लग्न पार पडणार असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणार आहेत. त्यानंतर १३ जुलै व १४ जुलै रोजी रिसेप्शन होणार आहे.
या सोहळ्यासाठी हॉलीवूड व बॉलीवूडमधील अनेक कलाकार मंडळी उपस्थिती दर्शवणार आहेत. अनेक राजकिय, क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रित केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत व राधिकाला आशिर्वाद देण्यासाठी या सोहळ्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित राहू शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या अहवालानुसार, अनंत व राधिका यांना आशिर्वाद देण्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हजेरीमुळे या शाही विवाह सोहळ्याची शोभा वाढणार आहे. दरम्यान सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनंत व राधिकाच्या लग्नासाठी मुंबईमध्ये दाखल झालया आहेत.
शाही विवाह सोहळ्याला सुरुवात झाल्यापासून त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांच्याही फोटो व व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. अनंत व राधिका हे लहानपणापासूनचे एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.