रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाला येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी, नेमकी काय भेटवस्तू घेऊन येणार?, अंबानींकडून काय रिटर्न गिफ्ट मिळणार?

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 12, 2024 | 3:46 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
pm narendra modi at anant and radhika wedding

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाला येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी, नेमकी काय भेटवस्तू घेऊन येणार?, अंबानींकडून काय रिटर्न गिफ्ट मिळणार?

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्याही प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा सुरु होती. आजवर अंबानी कुटुंबाने दोन वेळा प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन केले होते. दोन्ही वेळेस या सोहळ्यासाठी जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. आता या दोघांच्याही लग्नाची वेळ येऊन ठेपली आहे. अनंत व राधिकाच्या शाही विवाहसोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. मनोरंजन, औद्योगिक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले आहेत. (pm narendra modi at anant and radhika wedding)

अनंत व राधिका यांच्या शाही विवाह सोहळ्यातील विधीना सुरुवात झाली आहे. दोघांच्याही लग्नाचे वेळापत्रक समोर आले असून कोणते विधी कधी पार पडणार आहेत याबद्दलची माहिती समोर आली आहे. १२ जुलै रोजी म्हणजे आजपासून दुपारी ३ वाजता या विधींना सुरुवात झाली आहे. रात्री ९.३० वाजता लग्न पार पडणार असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणार आहेत.  त्यानंतर १३ जुलै व १४ जुलै रोजी रिसेप्शन होणार आहे.

आणखी वाचा – Video : राधिका-अनंत अंबानीच्या लग्नाचा सजला मंडप, कोटी रुपयांचा खर्च, मुहूर्तही ठरला, संपूर्ण वेळापत्रकच कुटुंबियांनी सांगितलं कारण…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या सोहळ्यासाठी हॉलीवूड व बॉलीवूडमधील अनेक कलाकार मंडळी उपस्थिती दर्शवणार आहेत. अनेक राजकिय, क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रित केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत व राधिकाला आशिर्वाद देण्यासाठी या सोहळ्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित राहू शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या अहवालानुसार, अनंत व राधिका यांना आशिर्वाद देण्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हजेरीमुळे या शाही विवाह सोहळ्याची शोभा वाढणार आहे. दरम्यान सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनंत व राधिकाच्या लग्नासाठी मुंबईमध्ये दाखल झालया आहेत.

आणखी वाचा- अक्षय कुमारला करोना, दोन दिवसांपासूनच होता आजारी, अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाला येण्यासही नकार

शाही विवाह सोहळ्याला सुरुवात झाल्यापासून त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांच्याही फोटो व व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. अनंत व राधिका हे लहानपणापासूनचे एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Tags: anant ambanipm narendra modiradhika merchant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
john cena at ambani wedding

अनंत अंबानीच्या लग्नासाठी मुंबईत आला जॉन सीना, तर किम कार्दशियनही वरातीत दाखल, रिक्षाने प्रवास अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.