अनंत अंबानी व राधिका मर्चंटसाठी आजचा हा दिवस खूप मोठा आहे. कारण ते आयुष्यभरासाठी एकमेकांशी लग्न करणार आहेत. जगभरातून सेलिब्रिटी लग्नासाठी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. जॉन सीना, किम-खलो कार्दशियनपासून ते लालू यादव, ममता बॅनर्जी, नरेंद्र मोदीपर्यंत दिग्गज मंडळी येण्यास तयार आहेत. पण या भव्य लग्नात एका सेलिब्रिटीची गैरहजेरी पाहायला मिळणार आहे. हा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार. या शाही लग्नात अक्षयच्या अनुपस्थितीचे कारण समोर आले आहे. ते म्हणजे अक्षय कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आढळला आहे. (Akshay Kumar Corona Positive)
सूत्रांनी IndiaToday.in ला सांगितले की, अक्षय गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ होता. सध्या अक्षय त्याच्या आगामी ‘सराफिरा’च्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी भेटी देताना दिसत आहे. यादरम्यान त्याने स्वतःची चाचणी केली त्यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे त्याने स्वतःला वेगळे ठेवले आहे आणि त्याच्या डॉक्टरांनी शिफारस केलेली सर्व खबरदारी घेत आहे. वृत्तानुसार, शुक्रवार, १२ जुलै रोजी सकाळी अभिनेत्याची चाचणी घेण्यात आली आणि त्यामुळे त्याला ‘सरफिरा’ चित्रपटाच्या प्रमोशनलाही जाता आलं नाही.
दुसरीकडे, अनंत अंबानी व राधिका मर्चंटचे लग्न १२ जुलैला पार पडणार असून, १३ जुलैला ‘शुभ आशीर्वाद’ आणि १४ जुलैला भव्य रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. अंबानींच्या लग्नाला जॉन सीना, माइक टायसन, जीन-क्लॉड व्हॅन डॅमे आणि जे शेट्टी, बोरिस जॉन्सन, टोनी ब्लेअर, जॉन केरी आणि स्टीफन हार्पर यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, अक्षय कुमारचा नवा चित्रपट ‘सराफिरा’ १२ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट २०२० मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट ‘सूरराई पोत्रू’चा अधिकृत रिमेक आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित चित्रपटात परेश रावल, राधिका मदन आणि सूर्या यांनी कॅमिओ केला आहे.