‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सध्या खूप मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत अमोलच्या शब्दाखातर अप्पी व अर्जुन एकत्र आलेले असतात. अप्पी व अर्जुन एकत्र यावेत म्हणून अमोल खूप प्रयत्न करत असतो. हे प्रयत्न अप्पीच्या लक्षातही येतात. अमोलच्या या प्रयत्नांना यश यावे आणि त्याला आई-बाबा मिळावेत यासाठी अप्पी अर्जुनकडे त्यांच्यातील प्रेमाबाबत भाष्य करते. अमोलमुळे अप्पी व अर्जुन एकत्र राहत असले तरी ते दोघे मनाने एकमेकांपासून केव्हाच दूर गेले आहेत. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विसर अद्याप अर्जुनला पडलेला नाही. सात वर्षांपूर्वी अपर्णाने केलेली चूक त्याच्या मनात सात वर्ष सलत राहिली. त्यामुळे अप्पीला तो कधीही माफ करायला तयार नाही. (Appi Amchi Collector Serial Troll)
मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अप्पी अर्जुनला विचारते, “आपण अमोलसाठी एकत्र राहतोय तर आपल्यात पुढे काही होऊ शकणार नाही का?, अमोलला असं वाटत आहे की आपण प्रेमाने एकत्र राहावं”, यावर अर्जुन स्पष्ट बोलतो, “अप्पी तुला नेमकं काय बोलायचं आहे?, मी तुला स्पष्टच सांगतो, आपल्यात परत प्रेम नाही होऊ शकत. कधीच नाही होऊ शकत”.
अर्जुनने अप्पीचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. यावरुन आता नेटकऱ्यांनीही अप्पीची बाजू घेत अमोलला दोषी ठरवलं आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत मालिकेला ट्रोलही केलं आहे. एका नेटकऱ्याने, “जर काय होऊच शकत नाही तर मग सगळं कुटुंब घेऊन तिच्याकडे कशाला राहायला आले आहेत. सरळ सरळ त्या अमोलला काय खर आहे ते सांगा आणि नसेल जमत तर मग बंद करा मालिका उगाच काहीही दाखवतात”, असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, “फालतूपणा आहे. अर्जुन जरा ओव्हर करत आहे. आता मालिका लांबवतात”, असं म्हणत अर्जुनला ट्रोल केलं आहे.
इतकंच नव्हे तर “मग प्रेम नाही तर कशाला अमोलचा बाबा होत आहेस. मूर्ख माणसा तू तुझ्या त्या नव्या बायकोकडे जा. उगाच मालिका वाढवून आमचाही वेळ वाया घालवत आहात”, “नको येऊ एकत्र तुझी लायकीच ती आहे. पण अप्पी चांगली आहे आणि अर्जुनच्या हातात कॅडबरी असूनही तो फालतू आर्यासारख्या बिस्किटाचा विचार करत आहे”, “अर्जुन व अप्पी दोघेही मंद आहेत. लग्न झालेल्या जोडप्याचे काय उदाहरण आहे. सात वर्षात एकदाही अर्जुनने बायको व मुलाला शोधलं नाही वा काही संपर्क केला नाही. आता परत समोर आले तर एवढी नाटक करत आहेत”, अशा अनेक कमेंट करत मालिकेला ट्रोल केलं आहे.