सध्या भारतभरात मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अनंत व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. वर्ष सुरु झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात दोघांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातील अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. हा प्री-वेडिंग सोहळा चांगलाच चर्चेत राहिला होता. त्यानंतर काही महिन्यातच दोघांचा दुसऱ्यांदा विवाहसोहळा पार पडला. हा विवाह सोहळा अलिशान क्रूझवर पार पडला. या सोहळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आता त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. (anant ambani and radhika merchant wedding schedule)
देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश यांच्या घरी लग्नकार्य पार पडणार आहे. काही वेळातच त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. शाही विवाहसोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गज, सिक्युरिटी, शाही आऊटफिट्स असे खूप काही पाहायला मिळत आहे. त्यांच्या लग्नाचे नक्की काय वेळापत्रक असणार आहे हे आता जाणून घेऊया. राधिका व अनंत यांच्या लग्नकार्याला सुरुवात झाली आहे. दुपारी तीन वाजता सर्व मंडळी एकत्र जमा होणार आहेत. त्यानंतर साफा बांधण्याचा विधी पार पडणार आहे.
त्यानंतर मिलनीचा विधी होणार असून रात्री आठ वाजता वरमाला पार पडणार आहे. त्यानंतर लग्न, सात फेरे व सिंदूर दानाचा विधी होणार आहे. हे विधी रात्री साडे नऊ वाजता पार पडणार आहेत. लग्नासाठी उपस्थित पाहुण्यांना पारंपरिक ड्रेसकोड देण्यात आले आहेत. त्यानंतर १३ व १४ जुलै या दिवशी रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यासाठी जगभरातील राजकीय, औद्योगिक, क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज लग्न व रिसेप्शन सोहळा पार पडणार आहेत.
दरम्यान अनंत व राधिकाच्या लग्नमंडपाचादेखील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये लग्नाचा भव्यदिव्य मंडप पाहायला मिळत आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी जगभरातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. बाबा विश्वनाथ मंदिराची प्रतिकृति तयार करण्यात आली आहे. तसेच बनारसची समृद्ध व प्राचीन परंपरांमध्ये लग्नाचे विधी पार पडणार आहेत. अंबानी कुटुंब हे हिंदू रीतिरिवाज व सनातन धर्माबद्दल खूप आस्था आहे. यामुळे त्यांनी काशी ही थीम निवडली आहे. तसेच यावेळी विष्णु दशावताराचेही प्रदर्शन केले आहे.