आपल्यापैकी अनेक जण किंवा आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील अनेक जण परदेशात शिकण्यासाठी किंवा व्यवसायासाठी जात असतात. परदेशात शिकत असताना कुटुंबाची येणारी आठवण यासह अन्य काही गोष्टींचा देखील सामना अनेकांना करावा लागतो. सामान्य माणूस असो वा कोणी मोठ्या कुटुंबातील प्रत्येकाला या गोष्टींना सामोरं जावं लागतं. परदेशात अशाच एका संकटाला सामोरं जावं लागलं होतं अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ याला. पॅरिसला असताना अनिकेतवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता आणि त्यातून तो कसा बचावला हा संपूर्ण किस्सा अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘बहुरूपी’ या आत्मचरित्रात सांगितला आहे. (ashok saraf son was attacked while in paris)
‘बहुरुपी’ या आत्मचरित्रात अशोक सराफ यांनी सांगितल्यानुसार “अनिकेत पॅरिसला असताना त्याच्यावर एक हल्ला झाला आणि या हल्ल्यात त्याची बॅग चोरीला गेली. सुदैवाने कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. मात्र चोरीला गेलेल्या बॅगमध्ये त्याचा पासपोर्ट होता. पुन्हा पासपोर्ट काढण्यासाठी त्याला भारतात येणं आवश्यक होतं आणि हातात केवळ एक आठवडा होता नाहीतर अनिकेतचं पूर्ण वर्ष वाया गेलं असतं”.

हे देखील वाचा- जावयाने शत्रुघ्न सिन्हा यांना दिलं खास सरप्राईज, सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस दणक्यात केला साजरा
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “यातून बाहेर येण्याचा विचार करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नेत्याने माझी मदत केली. माझ्या मदतीला धावून येणारे होते छगन भुजबळ. छगन भुजबळ साहेबांनी त्यावेळी अनिकेतला पुन्हा भारतात आणण्यासाठी मदत केली आणि अनिकेतचं ते वर्ष वाया गेलं नाही. पुढे त्याला त्याचं उरलेलं शिक्षण पूर्ण करता आलं. भुजबळ साहेब नेहमी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी नेहमी माझी मदत केली आहे. ते माझे जवळचे मित्र आहेत. त्यांची निर्मिती असलेल्या दोन्ही सिनेमांमध्ये मी भूमिका केलेली आहे. त्यांचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही”.
हे देखील वाचा- घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडला हनी सिंग, गर्लफ्रेंडचं नावंही आलं समोर, नक्की कोण आहे ‘ती’ मुलगी?
अशोक सराफ हे मराठीसह बॉलीवूडदेखील गाजवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्कारासह अनेक पुरस्करांचे ते मानकरी ठरले आहेत. आजवर अशोक सराफ यांनी ‘अशी ही बनवा बनवी’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’,’गोंधळात गोंधळ’,’नवरा माझा नवसाचा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. चित्रपटांसह अशोक सराफ नाट्यभूमीवरदेखील कार्यरत असून त्यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलंच गाजत आहे.