शनिवार, मे 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, वारीमध्ये चपात्याही केल्या अन्…; संस्कारांचं होत आहे कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 11, 2024 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
36 Guni Jodi serial fame Marathi actress Anushka Sarkate shared some special moments of her pandharpur wari video

श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, वारीमध्ये चपात्याही केल्या अन्...; संस्कारांचं होत आहे कौतुक

महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी. महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी. संतांची शिकवण म्हणजे वारी. घरुन निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायाचे आणि त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचे दर्शन ‘याची देही याची डोळा घेणे’ म्हणजे वारी. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी मंडळी हळूहळू विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. हा नयनरम्य सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे.

वारीचा हा नेत्रदीपक सोहळा अनुभव अनुभवण्यासाठी अनेक वारकरी पालखीत सहभागी होत असतात. सामान्य वारकऱ्यांबरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभाग घेत असतात. अशातच यंदाच्या वारीत एका मराठी अभिनेत्री सहभागी झाली असून तिने तिच्या वारी सोहळ्यातील खास क्षण तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत आणि ही अभिनेत्री म्हणजे ‘३६ गुणी जोडी’ फेम अनुष्का सरकटे.

View this post on Instagram

A post shared by Anushka Sarkate (@anushkasarkateofficial)

आणखी वाचा – Video : ‘सुख म्हणजे…’मधील शालीनीचा खऱ्या आयुष्यातील लेक करत आहेत तिची हेअरस्टाइल, व्हिडीओ पाहून कलाकारांकडूनही कौतुक

अनुष्का ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियार ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकताच वारीचा शेअर केलेला व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काने वारीत सहभाग घेतला असून तिने वारीतील वारकऱ्यांशी संवादही साधला आहे. त्याचबरोबर तिने यावेळी वारीतील सहभागी स्त्रियांबरोबर पुरणपोळ्याही बनवल्या. त्याचशिवाय तिने या वारीत स्वत:च्या डोक्यावर तुळसही घेतली आहे. तसेच वारीतील सर्वांशी तिने संवाद साधला आहे.

आणखी वाचा – अंबानी कुटुंबियांच्या लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला दिवसाचे मिळतात तब्बल इतके रुपये, ती व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

दरम्यान, तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिच्या या कृतीबद्दल कौतुक केलं आहे. अनुष्का सरकटे ही झी मराठीवरील ‘कारभारी लय भारी’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. अनुष्का सरकटेने यापूर्वी ‘श्री लक्ष्मी नारायण’ मालिकेत प्रमुख लक्ष्मीची भूमिका साकारली होती. ‘मी तुझीच रे’ या मालिकेतून अनुष्काने छोटया पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने दिव्याची भूमिका साकारली होती.

Tags: Anushka Sarkatemarathi actressmarathi entertainment newsPandharpur Wari
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Munawar Faruqui news
Entertainment

स्टँड-अप कॉमेडियन तिसऱ्यांदा झाला बाबा, सोशल मीडियावर दाखविली झलक, फोटो समोर

मे 2, 2026 | 10:35 am
 Sambhavna Seth life
Entertainment

चारवेळा गर्भपात, ६५ इंजेक्शन्स आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झालेल्या खूप वेदना, आता ४५ व्या वर्षी होणार आई

एप्रिल 30, 2026 | 3:00 pm
sambhavna seth is pregnant
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री लवकरच होणार आई, चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

एप्रिल 30, 2026 | 1:16 pm
 anil gawas on aastad kale
Entertainment

“फोन वाजतो तिकडे तुमचं लक्ष का?”, आस्ताद काळेच्या त्या व्हिडीओवर अभिनेते स्पष्टच बोलले, म्हणाले, “प्रेक्षक तुम्हाला…”

एप्रिल 29, 2026 | 5:16 pm
Next Post
Mirzapur Season 3 Prashansa Sharma

"कोणी चुकूनही हात लावला तर घाण वाटते", इंटिमेट सीन करुन 'मिर्झापूर'मधील नोकर रधियाची झालीय अशी अवस्था, म्हणाली, "किव येते…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.