‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू प्रीतम या सगळ्यांनी मिळून आदित्य व अहिल्यादेवी यांना एकत्र आणण्यासाठी एक नवा प्लॅन आखलेला असतो. प्रश्न उत्तरांचा खेळ खेळत दोघांच्यातला दुरावा दूर करण्याचे ते ठरवतात. तर हे सर्व गणीलासुद्धा माहीत असतं. गणी पारूला शोधायला म्हणून किचनमध्ये येतो तेवढ्यात त्याला दामिनी दिसते. दामिनी म्हणते आता हीच ती संधी आहे याच्याशी गोड बोलून याच्याकडून कोणता प्लॅन आहे ते जाणून घ्यायला हवं असं म्हणत ती गणीच्या हातावर लाडू देते आणि सांगते की, आजपासून आपण दोघे फ्रेंड्स आहोत. (Paaru Serial Update)
तुझी व माझी एक टीम आहे. मला तू सांगशील का की, नेमका कोणता प्लॅन घरात सुरु आहे. यावर गणी मला माहीतच होतं तुम्ही कामासाठीच माझ्याशी बोलत आहात, असं म्हणतो. मात्र दामिनी त्याला सांगते की, नाही रे असं काहीच नाही आहे. मी तुझ्याशी मैत्री करायला आले आहे. गणीही खूप शहाणा बनतो आणि तिला वेगळाच प्लॅन सांगतो. गणी सांगतो की, तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना की हे मी सगळं तुम्हाला सांगितलं यावर दामिनी नाही असे सांगते. आणि सांगते की, काय प्लॅन आहे. तेव्हा गणी सांगतो की, आदित्य सरांनंतर किर्लोस्कर कंपनीचे सगळे अधिकार हे तुम्हाला देण्यात येणार असल्याचे श्रीकांत सर बोलत होते आणि त्याच्याशिवाय एक इंटरनॅशनल मुलाखतसुद्धा लवकरच तुमच्यासाठी ठेवण्यात आली आहे. हे ऐकल्यावर दामिनीचा आनंद गगनात मावेनासा होतो.
त्यानंतर दामिनी गणीला घेऊन इंटरनॅशनल मुलाखतीसाठीची तयारी करताना दिसते. तर इकडे प्रीतमही डेमो तयारीसाठी एका कलाकाराला बोलावून घेतो मात्र त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न असतो की आईची भूमिका कोण साकारणार?, यावर प्रीतम पारूकडे बघतो. पारू सुरुवातीला नकार देते मात्र नंतर ती तयार होते. तर इकडे दामिनीची ही एक वेगळीच तयारी सुरु असते. मोहनही दामिनीला वेड्यात काढतो मात्र दामिनीला काहीच कळत नाही. तर गणीने दामिनीचा चांगला डाव पलटवलेला असतो. त्यानंतर इकडे पारू अहिल्यादेवी म्हणून तयार होऊन खाली येते. प्रश्न उत्तरांचा डाव खेळण्यासाठी सगळेचजण तयार होणार असतात.
तर इकडे श्रीकांतनेही अहिल्या ऑफिसमध्येच राहील याची काळजी घेतलेली असते. आता मालिकेच्या पुढील भागात अहिल्यादेवी घरात येताना दिसतात आणि त्या विचारतात हे इथे सगळं काय सुरु आहे हे ऐकल्यावर सगळेच एकमेकांकडे पाहू लागतात आणि चकित होतात आता अहिल्यादेवी समोर या प्रश्न उत्तरांच सत्य आल्यानंतर काय होणार हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.