सध्या अंबानी कुटुंबाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अगदी शाही थाटामाटात मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या धाकट्या लेकाचे म्हणजेच अनंत अंबानीचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा या शाही लग्नाकडे लागून राहिल्या आहेत. अनंत अंबानीबद्दल बोलायचे झाले तर त्याचे वजन बालपणापासून किशोरावस्थेपर्यंत खूप जास्त होते. पण नंतर त्याचे वजन नैसर्गिकरित्या कमी झाले. अनंत अंबानी २१ वर्षांचा असताना त्यांने १८ महिन्यांत १०८ किलो वजन कमी केले. त्याने हे कसे केले आणि त्यानंतर त्याचे वजन आज कसे झाले याबाबत आज आपण पाहणार आहोत. (Anant Ambani Weight Loss)
२०१६ मध्ये अनंत अंबानी यांनी १८ महिन्यांत १०८ किलो वजन कमी केले. खुद्द अनंत अंबानी यांनी एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती. रिपोर्ट्सनुसार, वजन कमी करताना अनंतने ठरवलं होतं की तो नैसर्गिकरित्या वजन कमी करेल. त्यासाठी त्यांनी स्वतः टाइट शेड्यूल बनवले होते. अनंत रोज त्याचा डाएट, जिम व ड्रिंक्स फॉलो करत असे. १८ महिने अनंतने जिममध्ये तासनतास घाम गाळला आहे. रोज ५-६ तास तो व्यायाम करायचा. शून्य साखरेचा आहार घ्यायचा आणि कर्बोदके समान असलेले पदार्थ तो खायचा. तो दररोज भरपूर चालत असे, योगासने करत असे आणि उच्च तीव्रतेचे कार्डिओ व्यायाम करत असे. अनंत त्यावेळी रोज २१ किलोमीटर चालत असे. त्याच्या या मेहनतीला हवे तसे फळही मिळाले. जिओ सिमकार्डच्या लॉन्च दरम्यान अनंत खूपच कमी वजनात दिसला.
अनंत अंबानी यांचे २०१६ मध्ये वजन कमी झाले होते. काही वर्षांनी अनंतचे वजन पुन्हा वाढले. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, अनंतला क्रोनिक अस्थमा नावाचा आजार आहे ज्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात औषधे त्याला घ्यावी लागतात. यामुळे तो लठ्ठपणाचा बळी ठरला. अनंत अंबानी व राधिका मर्चंट लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. अनंत अंबानी किशोरवयातच राधिकाला डेट करत होता आणि ते अनेक वर्षांपासून प्रेमात होते. राधिका मर्चंट व अनंत अंबानी आता लग्न करणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात खास काळ आहे. आधी जामनगर आणि नंतर इटलीमध्ये प्री-वेडिंग केल्यानंतर अखेर राधिका-अनंत मुंबई येथे लग्न बंधनात अडकणार आहेत.
राधिका-अनंतचा लग्नसोहळ्याची धामधूम मुंबईत सुरु आहे. पहिले संगीत, आणि हळदीनंतर अनंत-राधिकाचे लग्न १२ जुलैला होणार आहे. राधिका-अनंतची जुनी मैत्री १२ जुलै रोजी पती-पत्नीमध्ये बदलणार आहे. राधिका अनंतला प्रत्येक फंक्शनमध्ये कम्फर्टेबल फील करवताना दिसते.