‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू आदित्यच्या खोलीमध्ये येते आणि त्याच्यावर रागावते. तेव्हा आदित्य पारुला विचारतो की, तू माझ्याशी असं का वागत आहेस?, यावर पारू सांगते की, काल रात्री काय घडलं होतं हे तुम्हाला काहीच आठवत नाही आहे का?, यावर आदित्य सांगतो की, हो मला काहीच आठवत नाही आहे. तेव्हा पारू त्याला दारू प्यायल्याची आठवण करुन देतो. त्यानंतर आदित्यच्या लक्षात येते की तो दारू पिऊन आला होता. यावर आदित्य पारूला विचारतो हे आईला तर कळलं नाही ना?, तेव्हा पारू सांगते की, अहिल्यादेवींना अजून तरी याबाबत काहीच कळालं नाही आहे. (Paaru Serial Update)
त्यानंतर आदित्यला स्वतःवरच राग येतो की, मी असं का केलं. तितक्यात तिथं प्रीतम येतो आणि आदित्य प्रीतमचे आभार मानतो आणि सांगतो की, माझ्यामुळे तुला सगळ्यांच्या नजरेतुन उतरावे लागले यावर प्रीतम सांगतो की, याआधी मी सगळ्यांच्या नजरेतून उतरलेलोच होतो तू काही काळजी करु नकोस. त्यानंतर प्रीतम आपल्या खोलीत निघून जातो. त्याच वेळेला तिथे श्रीकांत येतो आणि श्रीकांत प्रीतमला बोलतो की, तू सुधारला आहेस असं आम्हाला वाटत होतं पण तसं काहीच झालं नाही. अहिल्याकडून मला सगळं काही कळालं आहे. हे ऐकल्यावर प्रीतम काहीच बोलत नाही. तितक्यात तिथे आदित्य येतो आणि सांगतो की, बाबा तुम्ही त्याला ओढू नका. काल त्याने नाही तर मी दारू पिऊन आलो होतो आणि माझी बाजू घेत याने सगळ्यांसमोर खोटं सांगितलं हे ऐकल्यावर श्रीकांतला प्रीतमचा अभिमान वाटतो. पण चूक लपवली म्हणून तो आदित्य व प्रीतमवर नाराज होतो. आणि श्रीकांत सांगतो की, यापुढे तुमच्या आईला त्रास होईल असं काही वागू नका.
आणखी वाचा – ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन, टीव्ही पाहताना हृदयविकाराचा तीव्र झटका
यावर दोघं त्याच्या वडिलांना शब्द देतात तर इकडे प्रिया मॅडम पारू बरोबर काम करत असतात तितक्यात त्यांच्या अंगावर चहा सांडतो तेव्हा पारू सांगते की खाली गेस्टरूम आहे तिथे जाऊन तुम्ही हे सर्व नीट करा. प्रीतम आंघोळ करून नुकताच बाहेर आलेला असतो त्याला टॉवेलवर पाहून प्रिया पाठ करते आणि सांगते की, असं कोणी बेडरूम मध्ये फिरत का?, यावर प्रीतम तिला सांगतो हे माझं घर आहे. माझं बेडरूम आहे. मी काही करीन असं म्हणून तिला नाचून दाखवतो. तर तितक्यात तिथे पारू येते आणि पारू सांगते की, ही ती रूम नाही आहे याच्या बाजूला एक रूम आहे तिथे तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर प्रीतम घरातील सगळ्या मंडळींना बंगल्याबाहेर बोलवतो आणि सांगतो की, पारूच्या डोक्यात एक प्लॅन आहे तो आपण करायचा आहे. प्रश्न उत्तरांचा असा काहीतरी खेळ आहे असे तो सांगतो. यावर अहिल्यादेवींची जबाबदारी तो सावित्री आत्याला देतो तर आदित्यची जबाबदारी तो स्वतः घेतो. श्रीकांत व मोहनही या प्लॅनमध्ये सामील असतात. पारू आल्यानंतर त्यांना प्लॅन समजावून सांगते. तेव्हा दामिनी बंगल्याच्या गॅलरीतून या सगळ्यांना एकत्र पाहून म्हणते की हा प्लॅन यांचा काहीतरी प्लॅन आहे आणि तो मला कळायलाच हवा.
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की दामिनीला हा प्लॅन माहीत नसतो त्यामुळे ती गणीला पकडते आणि गणीला दटावून त्याच्याकडून प्लॅन जाणून घेते. आता पारू प्रीतमने अहिल्यादेवी व आदित्य यांना एकत्र आणण्याचा प्लानमध्ये दामिनी कोणता खोळंबा करणार का?, हे सगळं मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.